सोसायट्यांचे पुनर्निर्माण-- कोथरूडच्या विकासाची किल्ली

श्री चंद्रकांत दादा पाटील कोथरूड पुणे येथून निवडणुका लढवत आहेत. या दरम्यान सुरू केलेल्या निवडणूक मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क आणि समाजाच्या सर्वच घटकांबरोबर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मोहिमेंतर्गत श्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट अनेक रहिवासी सोसायट्यांच्या प्रतिनिधींबरोबर झाली. या बैठकीच्या माध्यमातून श्री चंद्रकांत दादा पाटील यांना कोथरूड भागातील रहिवासी सोसायट्यांचे प्रश्न आणि अपेक्षा याविषयी महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीआधारे श्री पाटील यांनी असे प्रतिपादन केले की कोथरूडचा मेक-ओव्हर तेव्हा होऊ शकेल जेव्हा जुन्या सोसायट्यांचे पुनर्निर्माण करण्याचा मार्ग सोपा झालेला असेल. श्री पाटील यांनी निवडणूक मोहिमेअंतर्गत अनेक रहिवासी सोसायट्यांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना या सोसायट्यांच्या समस्यांविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची संधी प्राप्त झाली. तसेच स्थानिक प्रश्नांविषयी त्यांनी माहिती करून घेतली. यासाठी अनेक सोसायट्यांच्या ऑफिशियल बरोबर त्यांनी बैठका घेतल्या आणि त्यांचे प्रश्न राज्य सरकारच्या पातळीवर सोडवा सोडवण्या...