जम्मू - काश्मीर विषयी निर्णयावर प्रतिक्रिया
दिनांक पाच ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 आणि 35- ए बरखास्त केल्यामुळे जम्मू - काश्मीर संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले . त्यानुसार जम्मू - काश्मीर आता दोन केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाख मध्ये विभाजित करण्यात आले आहे . सतत आठ तासाच्या लोकसभेतील संसदेतील चर्चेनंतर या ऐतिहासिक आणि अत्यंत महत्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी जम्मू - काश्मीरमध्ये करण्यात आली. कलम 370 आणि 35- ए हटवून बीजेपी सरकारने अत्यंत विश्वासार्ह पाऊल पुढे टाकलेले आहे . माननीय पंतप्रधान श्री . नरेंद्र मोदी जी आणि गृहमंत्री श्री . अमित शहा यांनी त्यांच्या वचन पूर्ततेची अंमलबजावणी यानिमित्ताने केलेली आहे . विशेष म्हणजे या निर्णयाला इतर अनेक राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे ज्यामध्ये आम आदमी पार्टी , तेलुगु देसम पार्टी अशा पक्षांनी देशहिताला देशहिताला प्राधान्य देऊन बीजेपीला साथ दिली . अगोदर ट्रिपल तलाक कायदा आणि त्यानंतर आता कलम 370 चे काढणे हे मोदी सरकारचे भव्य यश म्हणावे लागेल . या ...