सौर ऊर्जा: शेतीसाठी एक मुबलक ऊर्जा स्त्रोत
सौर ऊर्जा हा ऊर्जेचा असा स्त्रोत आहे जो मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्याच्या वापराविषयी नेहमीच जनजागृती केली जाते . सुदैवाने भारताच्या ट्रॉपिकल हवामानामुळे भारतामध्ये सौर शक्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर करणे शक्य आहे . माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र श्री . चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतेच कोल्हापूर येथे एका सौरशक्ती प्रकल्पाचे लोकार्पण केले हा प्रकल्प 2.4 मेगावॅट क्षमतेचा असून सरकारी योजना " मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी " द्वारे निर्माण करण्यात आलेला आहे . या कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की शेतकऱ्यांना आणि उद्योगांना रास्त दरामध्ये विज उपलब्ध करून द्यायची असेल तर सौरऊर्जेला पर्याय नाही , तसेच सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये सरकारचे वाढते योगदान शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर ठरेल . नुकतेच माननीय महसूल मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री . चंद्रकांत दादा पाटील यांनी एका सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याला कोल्हापूर येथे उपस्थिती लावली . हा प्रकल्प ...