पालखी प्रस्थान सोहळा, आळंदी
महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय श्री . चंद्रकांत दादा पाटील यांची पुणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली . श्री . चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतीच माहिती दिली सरकारने या वर्षी पालखी उत्सवादरम्यान वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे . त्यांनी पुढे सांगितले की विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पालखी उत्सवात सहभागी होणाऱ्या विविध गटांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले जातील . सरकार यंदा वारी आणि पालखी उत्सव धूरमुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे . महसूल मंत्री श्री . चंद्रकांत दादा पाटील यांनी पालखी प्रस्थान सोहळ्याला आळंदी , पुणे येथे उपस्थिती लावली . याप्रसंगी श्री . चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती दिली की सरकार हे वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे . विविध सरकारी विभागांनी यावर्षी पालखी आणि वारी उत्सव सुरळीतपणे आणि सुखद सुखद रीतीने पार पडावा यासाठी वेगवेगळ...