पालखी प्रस्थान सोहळा, आळंदी


महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची पुणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतीच माहिती दिली सरकारने या वर्षी पालखी उत्सवादरम्यान वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी पुढे सांगितले की विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पालखी उत्सवात सहभागी होणाऱ्या विविध गटांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले जातील. सरकार यंदा वारी आणि पालखी उत्सव धूरमुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे.

महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी पालखी प्रस्थान सोहळ्याला आळंदी , पुणे येथे उपस्थिती लावली.
याप्रसंगी श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती दिली की सरकार हे वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. विविध सरकारी विभागांनी यावर्षी पालखी आणि वारी उत्सव सुरळीतपणे आणि सुखद सुखद रीतीने पार पडावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प पूर्णत्वास नेले आहेत. तसेच यंदा वारी उत्सवादरम्यान विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गॅस सिलेंडरची उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. सरकार पालखी उत्सव धूरमुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील असेल.

श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी पुढे सांगितले की सामाजिक जाणीव आणि जबाबदारी म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था विविध सामाजिक कार्यांसाठी सतर्क असतात. अशा संस्थांची भूमिका प्रभावी आणि पद्धतशीर पालखी आणि वारी उत्सवासाठी महत्त्वाची ठरते. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी सरकारने विविध मार्गांचा अवलंब केलेला आहे. राज्य सरकारने 50 हजार ड्रेस मटेरियलचे वाटप दुष्काळग्रस्त भागातील मुलींना केलेले आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बस पासची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ झालेला आहे. सरकार पूर्णपणे काळजी घेत आहे की दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात दुष्काळामुळे खंड पडू नये
श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी या कार्यक्रमा दरम्यान विविध धार्मिक संस्थांनाही आवाहन केले की त्यांनी अशा
पद्धतीने विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन सामाजिक जाणीव आणि जबाबदारीने वंचित जनतेला
सहाय्य करावे. ते पुढे म्हणाले की सरकारकडून वारकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वह्या आणि पेन यांचेही वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान आळंदी देवस्थान ट्रस्ट मार्फत पाच लाख रुपयांचा धनादेश श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे दुष्काळ निवारण निधीसाठी सुपूर्त करण्यात आला.
महाराष्ट्रामध्ये वारी आणि पालखी उत्सव हा अत्यंत धार्मिक, पारंपारिक पद्धतीने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. या उत्सवाचे आयोजन अतिशय पद्धतशीरपणे केले जाते आणि या उत्सवामध्ये लाखो भाविक राज्यभरातून सहभागी होतात. सरकार आणि विविध सामाजिक संस्थांचा सहभाग या उत्सवाच्या पद्धतशीर आखणी मध्ये महत्त्वाचा ठरतो. महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील हे पालखी प्रस्थान सोहळ्याला आळंदी येथे उत्साहाने सहभागी झाले. तिथे त्यांनी पालखी उत्सवासाठी आखलेल्या विविध सरकारी कामांची माहिती दिली. तसेच त्यांनी विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांना दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन दिले. यामधून त्यांची सामाजिक जाणीव आणि जनतेविषयी असणारा सहृदय दृष्टिकोन स्पष्ट होतो. यंदा आपण आशा करू शकतो की वारी उत्सव अधिक सोईस्कर आणि सुखद असेल आणि यामागे सरकार आणि विविध सामाजिक संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असेल.

Comments

Popular posts from this blog

High Priority to The Completion of Pending Highway Works

Press Conference at Kolhapur

Statement on Pune’s 8 Vidhan Sabha Constituencies