सोसायट्यांचे पुनर्निर्माण-- कोथरूडच्या विकासाची किल्ली



श्री चंद्रकांत दादा पाटील कोथरूड पुणे येथून निवडणुका लढवत आहेत. या दरम्यान सुरू केलेल्या निवडणूक मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क आणि समाजाच्या सर्वच घटकांबरोबर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मोहिमेंतर्गत श्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट अनेक रहिवासी सोसायट्यांच्या प्रतिनिधींबरोबर झाली. या बैठकीच्या माध्यमातून श्री चंद्रकांत दादा पाटील यांना कोथरूड भागातील रहिवासी सोसायट्यांचे प्रश्न आणि अपेक्षा याविषयी महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीआधारे श्री पाटील यांनी असे प्रतिपादन केले की कोथरूडचा मेक-ओव्हर तेव्हा होऊ शकेल जेव्हा जुन्या सोसायट्यांचे पुनर्निर्माण करण्याचा मार्ग सोपा झालेला असेल. 


श्री पाटील यांनी निवडणूक मोहिमेअंतर्गत अनेक रहिवासी सोसायट्यांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना या सोसायट्यांच्या समस्यांविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची संधी प्राप्त झाली. तसेच स्थानिक प्रश्नांविषयी त्यांनी माहिती करून घेतली. यासाठी अनेक सोसायट्यांच्या ऑफिशियल बरोबर त्यांनी बैठका घेतल्या आणि त्यांचे प्रश्न राज्य सरकारच्या पातळीवर सोडवा सोडवण्याचे आश्वासन यावेळी दिले.

यावेळी श्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की सोसायट्यांच्या पुनर्निर्माणच्या सध्याच्या कायद्यानुसार या सोसायट्यांना कमीतकमी नऊ मीटर रुंद रस्ता आवश्यक आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत हा नियम बदलून त्याऐवजी सहा मीटर रुंद रस्ता असणार्‍या सोसायट्यांना पुनर्निर्माण करू द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. अशा प्रकारचा बदल जर नियमात करता आला तर तो क्रांतिकारक ठरेल आणि त्यामुळे आधुनिकीकरण आणि शहरीकरणाचे नवीन मार्ग दृष्टिपथात येतील.

श्री पाटील पुढे म्हणाले याबरोबरच इतरही अनेक मुद्दे विचाराधीन आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने क्लस्टर डेव्हलपमेंट मॉडेल मुंबई-परळ येथे यशस्वी झालेले आहे, अशा प्रकारचे मॉडेल कोथरूडमध्ये राबवता येईल का तसेच FSI वाढवून आडव्या विस्तारापेक्षा उभ्या विस्तारावर भर देता येईल का, आणि दोन किंवा अधिक हाउसिंग सोसायट्यांचे एकत्रित पुनर्निर्माण करता येईल का, इत्यादी मुद्द्यांवर विचार केला जात आहे.

श्री पाटील यांनी कोथरूडला विकासाच्या दिशेने देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रवासामध्ये त्यांना नागरिकांचेही सहकार्य आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे. त्याचबरोबर कोथरूडच्या विकासाचे सर्व प्रयत्न हे राज्य शासनाच्या विकासाच्या उद्दिष्टांना अनुसरूनच असणार आहेत. श्री पाटील यांना असा विश्वास वाटतो की कोथरूड परिसरातील सुसंस्कृत आणि सुशिक्षित नागरिक कोथरूडच्या अशा पद्धतीच्या विकासाला निश्चितच पाठिंबा देतील.

श्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक मोहिमेच्या संदर्भात घेतलेली मेहनत आणि दृष्टिकोन निश्चितच प्रशंसनीय आहेत. त्यांनी या दरम्यान विविध घटकांबरोबर संवाद साधला त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, खेळाडू, कलाकार, रहिवासी सोसायट्यांचे ऑफिशियल अशा विविध घटकांचा समावेश आहे. कोथरूड हा ऐतिहासिक पुण्याचा भाग असून पूर्वी कोथरूड परगणा या नावाने ओळखला जात असे.नंतर कोथरूडचा समावेश पुणे महापालिकेच्या हद्दीत झाला. या भागाची विशेष ओळख तेथील आदर्श आणि सुसज्ज अशा रहिवासी वस्त्यांसाठी आहे. परंतु काळानुसार या सोसायट्यांची मागणी आता पुनर्निर्माणासच्या दिशेने आहे, ज्यामुळे तेथे आधुनिक रचना आणि सुख-सुविधा प्राप्त होऊ शकतील. या सर्व मागण्यांविषयी असणारे तांत्रिक मुद्दे आणि कायदेशीर बाबी अवघड आहेत. आशा आहे श्री चंद्रकांत दादा पाटील या सर्व गोष्टींमधून योग्य असा सुवर्णमध्य काढू शकतील ज्याद्वारे कोथरूडची वाटचाल आधुनिकीकरण आणि शहरीकरण यांच्या दिशेने अधिक जोमाने सुरू होईल आणि हे सर्व करण्याची संधी श्री पाटील यांना प्राप्त होईल.

Comments

Popular posts from this blog

“Karkarta Karta-Dharta” Movement—A Huge Success

Press Conference at Kolhapur- Chandrakant Patil