मराठा समुदायाचे आरक्षण वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना लागू
मराठा समुदायाची मराठा आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती आणि 2018 मध्ये ती मान्य करण्यात आली . हा निर्णय माननीय मुख्यमंत्री श्री . देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील बीजेपी सरकारसाठी एक उत्तुंग यशाची कमान ठरला . मराठा समुदायाला 16% आरक्षण नोकरी आणि शिक्षणामध्ये दिलेले असताना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिये दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वादंग उठला आणि या वर्षी हे आरक्षण नाकारण्यात आले . राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री . चंद्रकांत दादा पाटील हे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्षही आहेत आणि त्यांनी मराठा समुदायाच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या आरक्षणाच्या निर्णयाबाबत निश्चिंत राहण्यास सांगितले तसेच हे आरक्षण लागू होईल असा विश्वास दिला . राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री . चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती दिली की मराठा आरक्षणाचा निर्णय वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या वर्षापासूनच लागू झालेला आहे . राज्य...