अभेद्य अशी शिवसेना- बीजेपी युती
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री . चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री . शरद पवार यांच्यावर निशाणा साधला . माननीय श्री . चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमाला नुकतीच उपस्थिती लावली . या कार्यक्रमादरम्यान श्री . चंद्रकांत दादा पाटील असे म्हणाले की शिवसेना - बीजेपी यांची युती अभेद्य आहे आणि ती दोन्ही पक्षांची ताकदही आहे . इतर कोणत्याही राजकीय पक्षाला या युतीला आवाहन देणे आणि पराभूत करणे अशक्य आहे . शिवसेना - बीजेपी युतीने राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व बालेकिल्ले उद्ध्वस्त केलेले आहेत . महसूल मंत्री श्री . चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्ह्यामधील कवठेपिराण गावामध्ये एका कार्यक्रमाला नुकतीच उपस्थिती लावली . हा कार्यक्रम हिंदकेसरी श्री . मारुती माने यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आयोजित करण्यात आलेला होता . या कार्यक्रमाला इतर अतिथीमध्ये कृषी राज्यमंत्री श्री . सदाभाऊ खोत , आमदार श्री . धैर्य...