हरित इमारत संकल्पना: पीडब्ल्यूडीचे आदर्श मॉडेल
माननीय बीजेपी अध्यक्ष श्री . चंद्रकांत दादा पाटील यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि महसूल मंत्री अशा यशस्वी कार्यकाळाची आता सांगता होत आहे . त्याचबरोबर त्यांनी कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ही जबाबदारी देखील समर्थपणे सांभाळली . नुकतेच श्री . चंद्रकांत दादा पाटील यांची बीजेपी अध्यक्ष महाराष्ट्र म्हणून नियुक्ती झाली आणि आता ते विधानसभा निवडणूका मोहिमांमध्ये व्यस्त आहेत . राज्य मंत्रिमंडळात अनेक जबाबदाऱ्या सार्थपणे सांभाळत असताना श्री . चंद्रकांत दादा पाटील यांनी नेहमीच प्रयोगशील , नाविन्यपूर्ण , आणि आधुनिक विचारांचा अवलंब केला . त्यांच्या अशा विचारसरणीमुळे ते महाराष्ट्राचे सर्वात नाविन्यपूर्ण , उत्पादनशील , आणि कर्तबगार मंत्री म्हणून ओळखले जातात . काही दिवसांपूर्वी माननीय श्री . दादा पाटील यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर महसूल विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा संदर्भ दिला ज्यामध्ये सेवांचे यांत्रिकीकरण , तसेच सातबारा उतारा डिजिटायझेशन , डिजिटल सिग्नेचर , आणि जा...