मराठा समुदायाला आरक्षण -- बीजेपी सरकारचे उत्तुंग यश
महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समुदायाची आरक्षणाची मागणी 1968 पासून प्रलंबित होती . 2018 मध्ये माननीय मुख्यमंत्री श्री . देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षण नोकरी आणि शिक्षणामध्ये प्राप्त करून दिले . नुकतेच श्री . चंद्रकांत दादा पाटील , राज्याचे कृषी आणि महसूल मंत्री यांनी नमूद केले की मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे बीजेपी सरकारचे सर्वोत्कृष्ट यश मानले जाते . माननीय श्री . चंद्रकांत दादा पाटील यांच्या मते 2014 च्या निवडणुकांपूर्वीच बीजेपी सरकारने मराठा समुदायाला आरक्षणाच्या मागणीविषयी आश्वासित केले होते . जेव्हा बीजेपी सरकारला संधी मिळाली तेव्हा बीजेपीने मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करून या समाजाला न्याय दिलेला आहे . श्री . चंद्रकांत दादा पाटील यांच्या मते मराठा समाजाचे आरक्षण हे मागच्या 70 वर्षातील कोणत्याही सरकारचे सर्वात मोठे यश आहे . श्री . चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांचे मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचे विचार सभागृहामध...