मराठा समुदायाला आरक्षण -- बीजेपी सरकारचे उत्तुंग यश


महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समुदायाची आरक्षणाची मागणी 1968 पासून प्रलंबित होती. 2018 मध्ये माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षण नोकरी आणि शिक्षणामध्ये प्राप्त करून दिले. नुकतेच श्री. चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे कृषी आणि महसूल मंत्री यांनी नमूद केले की मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे बीजेपी सरकारचे सर्वोत्कृष्ट यश मानले जाते
माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या मते 2014 च्या निवडणुकांपूर्वीच बीजेपी सरकारने मराठा समुदायाला  आरक्षणाच्या मागणीविषयी आश्वासित केले होते. जेव्हा बीजेपी सरकारला संधी मिळाली तेव्हा बीजेपीने मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करून या समाजाला न्याय दिलेला आहे. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या मते मराठा समाजाचे आरक्षण हे मागच्या 70 वर्षातील कोणत्याही सरकारचे सर्वात मोठे यश आहे. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांचे मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचे विचार सभागृहामध्ये व्यक्त केले.
महसूल मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील यांनी  विधानसभेमध्ये सभापतींच्या भाषणानंतर झालेल्या चर्चेदरम्यान त्यांचे मराठा आरक्षणाविषयीचे विचार मांडले. या चर्चेदरम्यान श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी असे सांगितले की मराठा समाजाचे आरक्षण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता आणि या मागणीची पूर्तता करण्यात बीजेपीला यश मिळालेले आहे .परंतु यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. राज्य सरकारने मराठा समाजाला असे आरक्षण देऊ केले आहे जे वादातीत असेल आणि यामध्ये पुन्हा त्रुटी निघणार नाहीत. काँग्रेस सरकारनेदेखील मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध करण्यात यश प्राप्त झाले नव्हते. बीजेपी सरकारने स्वतंत्र आयोगाची स्थापना करून मराठा समाज मागास असून त्यांना मागास वर्गातील सर्व अधिकार लागू व्हावेत हे सिद्ध केले. या पद्धतशीर दृष्टिकोनामुळे आज मराठा समाज घटनेनुसार आरक्षण प्रक्रियेस पात्र ठरलेला आहे.
आदरणीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी मराठा आरक्षण प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाची ही स्तुती केली. ते म्हणाले की या आयोगाने उत्कृष्ट पद्धतीने काम करून मराठा समाजाला इतर मागास वर्गीय समाजाप्रमाणे आरक्षण लागू केले आहे. या चर्चेदरम्यान श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबद्दल ही भाष्य केले. ते म्हणाले की बीजेपी सरकारला मुस्लिम समाजाच्या आरक्षणासंदर्भात धारेवर धरले जाते, परंतु श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्टीकरण दिले की मुस्लिम समाजाच्या ओबीसी प्रवर्गाला पहिल्यापासूनच आरक्षण लाभलेले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करण्याची आणि बीजेपीवर टीका करण्याची आवश्यकता नाही.
महाराष्ट्र राज्याचा इतिहासामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. छत्रपती शाहू महाराज यांनी 1902 मध्ये मराठा समाजाला आरक्षण लागू केले होते, परंतु स्वातंत्र्यानंतर ते स्पष्ट झाले. यापूर्वीच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी या प्रक्रियेसाठी प्रयत्न केले परंतु मराठा आरक्षणाची प्रक्रिया कुणालाच पूर्ण करता आली नाही. माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय पद्धतशीरपणे काम करून मराठा आरक्षणाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलेली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण नोकरी आणि शिक्षणामध्ये लागू केले आहे.
राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी मराठा आरक्षण प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांच्याकडून या मोहिमेसंदर्भात मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर अपेक्षा होत्या. श्री. चंद्रकांत दादा पाटील हे मराठा समुदाय आरक्षण समितीचे अध्यक्षही होते. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पूर्ततेसाठी त्यांना श्रेयस्कर मानले जाते. मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय हा बीजेपीचा 2019 च्या निवडणुकांसाठी महत्त्वाचा प्रचाराचा मुद्दा ठरला आहे आणि याचा परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकांमध्ये बीजेपीला 40 हून अधिक जागांच्या माध्यमातून यश प्राप्त झालेले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयामुळे बीजेपीला मराठा समुदायाचे लक्ष आणि आधार कायमस्वरूपी मिळण्यात झालेला आहे. तसेच या मधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अकार्यक्षम नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

High Priority to The Completion of Pending Highway Works

Press Conference at Kolhapur

Statement on Pune’s 8 Vidhan Sabha Constituencies