निवडणूक मोहिमेदरम्यान रिक्षामधून प्रवास
पुणे शहराची सर्वात मोठी समस्या ट्रॅफिक ही आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई शहरांच्या एका सर्व्हेनुसार पुणे शहर ट्राफिकच्या बाबतीत पहिल्या दहामध्ये आहे आणि पुणे आणि बेंगलोर या शहरांनी भारताच्या तीन मेट्रो सिटी दिल्ली, चेन्नई, आणि मुंबईला देखील ट्राफिकच्या बाबतीत मागे टाकलेले आहे. त्यातच पदयात्रा, जोरदार पाऊस, उत्सवाचे दिवस अशी कारणे असतात तेव्हा तर पुणे शहरातील ट्राफिकची समस्या अधिकच गंभीर बनते. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र, अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील हे कोथरूड पुणे येथून निवडणूक लढवत आहेत. नुकतेच त्यांनी एक आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले जे विशेष करून राजकीय व्यक्तींना अनुकरणीय ठराव. श्री चंद्रकांत दादा पाटील सध्या कोथरूड पुणे भागामध्ये निवडणूक मोहिमेच्या कामात प्रचंड व्यस्त आहेत. त्यांच्या रोजच्या दिनक्रमामध्ये विविध सभा, बैठकी, रॅली, पदयात्रा, चर्चासत्र आणि संस्था, क्लब इत्यादींना भेटीगाठी अशा गोष्टींचा समावेश होतो. नुकताच त्यांच्या एका रोड-शोचे आयोजन कोथरूड येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून नं...