निवडणूक मोहिमेदरम्यान रिक्षामधून प्रवास



पुणे शहराची सर्वात मोठी समस्या ट्रॅफिक ही आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई शहरांच्या एका सर्व्हेनुसार पुणे शहर ट्राफिकच्या बाबतीत पहिल्या दहामध्ये आहे आणि पुणे आणि बेंगलोर या शहरांनी भारताच्या तीन मेट्रो सिटी दिल्ली, चेन्नई, आणि मुंबईला देखील ट्राफिकच्या बाबतीत मागे टाकलेले आहे. त्यातच पदयात्रा, जोरदार पाऊस, उत्सवाचे दिवस अशी कारणे असतात तेव्हा तर पुणे शहरातील ट्राफिकची समस्या अधिकच गंभीर बनते. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र, अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील हे कोथरूड पुणे येथून निवडणूक लढवत आहेत. नुकतेच त्यांनी एक आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले जे विशेष करून राजकीय व्यक्तींना अनुकरणीय ठराव. 


श्री चंद्रकांत दादा पाटील सध्या कोथरूड पुणे भागामध्ये निवडणूक मोहिमेच्या कामात प्रचंड व्यस्त आहेत. त्यांच्या रोजच्या दिनक्रमामध्ये विविध सभा, बैठकी, रॅली, पदयात्रा, चर्चासत्र आणि संस्था, क्लब इत्यादींना भेटीगाठी अशा गोष्टींचा समावेश होतो. नुकताच त्यांच्या एका रोड-शोचे आयोजन कोथरूड येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून नंतर नवग्रह मंदिर, भालके नगर, अत्रे सोसायटी ,गुजरात कॉलनी, शास्त्रीनगर आणि शेवटी आशिष गार्डन येथे सांगता अशाप्रकारे होते. या कार्यक्रमानंतर श्री पाटील यांना खासदार रावसाहेब दानवे यांच्या सोबत एका सभेला जाणे क्रमप्राप्त होते. परंतु या सर्व भरगच्च कार्यक्रमादरम्यान श्री पाटील यांची गाडी प्रचंड गर्दी असणाऱ्या रस्त्यांवर जाऊ शकत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये श्री पाटील यांनी लवकर पोहोचण्यासाठी ऑटोरिक्षाचा पर्याय निवडला. त्यांनी कोथरूडमधील अरुंद रस्ते आणि वस्त्यांमध्ये रिक्षाचा प्रवास केला. जेव्हा ते जवळच्या हायवेला पोहोचले तेव्हा त्यांच्या गाडीने पुढे बालेवाडीला निघाले.

माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचा रिक्षाचा प्रवास सर्वांच्या चर्चेचा आणि विस्मयाचा मुद्दा झाला होता. त्यांच्या रिक्षा प्रवासामुळे त्यांना ट्रॅफिक आणि पुढे होणारे उशीर दोन्ही टाळण्यात मदत झाली. कोथरूडमधील जनतेने त्यांच्या विशेष प्रवासाची दखल घेतलेली आहे.

श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नेहमीच वक्तशीरपणाला प्राधान्य दिले आहे. तसेच ते सामान्य लोकांचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या साध्या राहणीमानाची चर्चा जनतेमध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये देखील होते. श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या रिक्षा प्रवासातून त्यांची सामाजिक जाणीव, वक्तशीरपणा, आणि सामंजस्य अधोरेखित होते. तसेच कोल्हापूर मधील लोकं श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे सामान्य माणसाशी असणारे नाते आणि साधी विचारधारा नेहमीच ओळखून आहेत. या उदाहरणामुळे कोथरूडकरानाही हा अनुभव आला असे म्हणावे लागेल.

दरम्यान श्री चंद्रकांत पाटील कोथरूड विभागातून महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकांना उभे आहेत. तसेच ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ही आहेत. श्री पाटील यांनी निवडणूकमोहिमांदरम्यान कोथरूड परिसरातील ट्रॅफिक या प्रश्नाला महत्व दिलेले आहे आणि त्यांच्या आगामी कार्यकाळात या मुद्द्याला हात घालण्याचे स्पष्ट केलेले आहे. तसेच डांगे चौक परिसरातील उड्डाणपुलाचे काम जोर धरेल जेणेकरून या परिसरातील ट्रॅफिकचा प्रश्न कमी होईल असेही आश्वस्त केले आहे. येत्या 21 ऑक्टोबरला कोथरुड विभागाच्या नवीन आमदाराची नियुक्ती निश्चित होईल आणि याद्वारे अनेक नवीन योजना आणि प्रकल्प यांचे भवितव्य ठरवले जाईल.

Comments

Popular posts from this blog

Press Conference at Kolhapur- Chandrakant Patil

सोसायट्यांचे पुनर्निर्माण-- कोथरूडच्या विकासाची किल्ली

Positive Communication with Oil Companies for Gas/Stoves and Cylinder Availability