"कार्यकर्ता-कर्ताधर्ता" संकल्पनेवर सुंदर स्पष्टीकरण


महाराष्ट्रामध्ये 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळे सध्या सर्वच बीजेपी नेते मतदारांना आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नुकतेच बीजेपीच्या नेत्यांनी "कार्यकर्ता-कर्ताधर्ता" अशा एका ट्विटर मोहिमेची सुरुवात केलेली आहे जी विशेष करून बीजेपीच्या सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांची प्रशंसा करण्यासाठी आखण्यात आलेली आहे. बीजेपी महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या ट्विटर कव्हर पेजला "कार्यकर्ता कर्ताधर्ता" असा टॅग लावून सर्व बीजेपीच्या कार्यकर्त्यांना अधोरेखित केलेले आहे.
या ट्विटर थीम मागील मुख्य उद्देश बीजेपीच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाप्रतीच्या निष्ठेसाठी आणि मेहनतीसाठी प्रोत्साहित करणे हा आहे. माननीय महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यासंदर्भात ट्विटर वर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी "कार्यकर्ता-कर्ताधर्ता" ही संकल्पना अतिशय सुंदरपणे स्पष्ट केलेली आहे. श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले आहे की ही संकल्पना महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार धारणेतून साकार झालेली आहे. श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमी त्यांच्या स्वराज्याचे कार्यकर्ते म्हणजे मावळे यांना स्वराज्याच्या प्रत्येक कामांमध्ये आणि नेतृत्वशैली मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करीत असत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या मावळ्यांसाठी दाखवलेल्या विश्वासामुळे हे सर्वच मावळे त्यांच्याप्रती अत्यंत प्रामाणिक होते. या सर्वसमाविष्ट दृष्टिकोनामुळे शिवाजी महाराजांना मावळ्यांच्या स्वरूपात एक मोठा आधार मिळाला होता आणि वेळप्रसंगी या मावळ्यांनी या स्वराज्याच्या कार्यासाठी जीवाचीही पर्वा केलेली नव्हती.
माननीय बीजेपी अध्यक्ष महाराष्ट्र श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या व्हिडिओमार्फत सांगितले आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमीच एक आदर्श राजाचे उदाहरण राहिले असून यामागे त्यांचे नेतृत्वशैली, व्यवस्थापन, अधिकार आणि कामाचे वाटप अशा अनेक पैलूंचा समावेश आहे. राजे शिवाजी महाराज यांनी  स्वराज्य मध्ये सुराज्य निर्मितीचा प्रयत्न राज्यामध्ये सुरक्षा, पाणी व्यवस्थापन, बाजार व्यवस्थापन, आणि दैनंदिन जीवनाच्या अनेक आवश्यक गोष्टींच्या माध्यमातून साकार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राज्य कसे असावे या संदर्भात त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापन आणि नियोजन कौशल्याच्या माध्यमातून याचे उदाहरणच दर्शविले परंतु हे सर्व त्यांना स्वराज्य कार्यकर्ते किंवा मावळ्यांच्या सहभागामुळे शक्य झाले. त्यांनी स्वराज्याच्या प्रत्येक घटकांना सन्मानाने वागून स्वराज्याच्या सर्व प्रक्रियांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला.
माननीय महसूल मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेवर प्रकाश टाकलेला आहे. तसेच या विचारधारेला अनुसरून  बीजेपीनेसुद्धा "कार्यकर्ता-कर्ताधर्ता" अशा थीमच्या माध्यमातून बीजेपीच्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व कार्यकर्त्यांच्या सहभागाशिवाय कोणत्याही नेत्याला त्यांची ध्येय साध्य करणे अशक्य आहे, मग ही उद्दिष्टे निवडणुका संदर्भातली असोत अथवा सरकारी कामा संदर्भातील असोत. पक्षाचे कार्यकर्ते हे नेहमीच मतदारांशी संपर्कात असतात आणि त्यामुळे मतदारांना योग्य संदेश देण्यात त्यांचा हात महत्त्वाचा असतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मतदारांशी असलेले चांगले संबंध यामुळे पक्षाला अधिकाधिक बळकटी प्राप्त होते.
माननीय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळ्यांच्या प्रती असणारी असणारा दृष्टीकोण उत्कृष्टरित्या मांडलेला आहे. या व्हिडिओच्या शेवटी श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हे ही स्पष्ट केले आहे की बीजेपीदेखील महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे बीजेपीच्या सर्वच आधारस्तंभ आणि घटकांसाठी  सर्वसमावेशक दृष्टीकोनाचा अवलंब करेल.  
सारांश काय तर, आम्हाला असे वाटते की "कार्यकर्ता-कर्ताधर्ता" संकल्पनेच्या माध्यमातून बीजेपीने सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला असून या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग येत्या निवडणूकांच्या संदर्भात महत्त्वाचा ठरणार आहे. अनुभवी आणि तज्ञ नेते श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा दृष्टिकोन उत्कृष्टरित्या स्पष्ट केलेला आहे आणि  याद्वारे त्यांनीही बीजेपीच्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानित केले आहे.

Comments

Popular posts from this blog

High Priority to The Completion of Pending Highway Works

Press Conference at Kolhapur

Statement on Pune’s 8 Vidhan Sabha Constituencies