हरित इमारत संकल्पना: पीडब्ल्यूडीचे आदर्श मॉडेल
माननीय बीजेपी अध्यक्ष श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि महसूल मंत्री अशा यशस्वी कार्यकाळाची आता सांगता होत आहे. त्याचबरोबर त्यांनी कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ही जबाबदारी देखील समर्थपणे सांभाळली. नुकतेच श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची बीजेपी अध्यक्ष महाराष्ट्र म्हणून नियुक्ती झाली आणि आता ते विधानसभा निवडणूका मोहिमांमध्ये व्यस्त आहेत. राज्य मंत्रिमंडळात अनेक जबाबदाऱ्या सार्थपणे सांभाळत असताना श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी नेहमीच प्रयोगशील, नाविन्यपूर्ण, आणि आधुनिक विचारांचा अवलंब केला. त्यांच्या अशा विचारसरणीमुळे ते महाराष्ट्राचे सर्वात नाविन्यपूर्ण, उत्पादनशील, आणि कर्तबगार मंत्री म्हणून ओळखले जातात.
काही दिवसांपूर्वी माननीय श्री. दादा पाटील यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर महसूल विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा संदर्भ दिला ज्यामध्ये सेवांचे यांत्रिकीकरण, तसेच सातबारा उतारा डिजिटायझेशन, डिजिटल सिग्नेचर ,आणि जागांच्या मॅपिंगसाठी ड्रोन कॅमेराचा उपयोग इत्यादींचा समावेश होता. त्यांनी महसूल विभागाच्या 16 सुविधा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आणि त्यामुळे लोकांना महसूल विभाग संदर्भातील सेवांसाठी सोय सोयीस्कर झालेले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचा विचार केल्यास या विभागामध्ये त्यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केले जे त्यांची नावीन्यपूर्ण, उत्पादनशील आणि प्रभावी विचार पद्धती अधोरेखित करतात. श्री. चंद्रकांत दादा पाटिल यांना सर्व सरकारी इमारतींसाठी हरित इमारती ही संकल्पना विकसित करायची असून याद्वारे या इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी केले जाईल. यानुसार 201 इमारतींचे बांधकाम पूर्ण झालेले आहे आणि 165 नवीन इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्यांच्या संकल्पनेनुसार इमारतींनी कमीत कमी विजेचा वापर करणे अपेक्षित आहे. तसेच या इमारती या दिव्यांग नागरिकांसाठी सुखद अनुभव असणे गरजेचे आहे त्यानुसार रंप आणि लिफ्ट अशा सुविधा येथे उपलब्ध करण्यात येतील. त्यानुसार 129 कामांना सुरुवात झालेली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. पाटील यांनी इ-वाहनांचा समावेश पारंपारिक पेट्रोल आणि डिझेल वरील वाहनांच्या ऐवजी करण्यावर भर दिलेला आहे.इ-वाहनांच्या वापरामुळे पेट्रोल आणि डिझेलचा खप कमी राहील आणि तसेच हा प्रयत्न पर्यावरण पूरक व प्रदूषण मुक्त असेल. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना सर्व सरकारी इमारती आणि कॅम्पस इ-वाहनांच्या प्रणालीने जोडायचे आहेत आणि या योजनेनुसार पाच इ-वाहनांची खरेदी झालेली आहे. या वाहनांमुळे चांगल्या पद्धतीची प्रवासी व्यवस्था सरकारी इमारतींमध्ये आणि परिसरामध्ये निर्माण झालेली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी सरकारी इमारतींसाठी हरित इमारती अशी अभिनव संकल्पना सुरू केली आहे. ही संकल्पना अतिशय प्रशंसनीय असून यामधून एका पर्यावरण पूरक प्रणालीची रचना होऊ शकते. हरित इमारती मॉडेलद्वारे सौर ऊर्जा, घनकचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आणि कमी ऊर्जेचा वापर इत्यादींवर भर देण्यात आलेला आहे.
चंद्रकांत दादा पाटील यांची हरित इमारत ही संकल्पना सध्या प्रगतीपथावर आहे. जेव्हा सर्व सरकारी इमारतींमध्ये या संकल्पनेचा वापर पूर्णपणे करण्यात येईल तेव्हा या संकल्पनेला भव्य यश मिळाले असे म्हणता येईल. हरित इमारती मॉडेल हे एक आदर्श मॉडेल ठरू शकते आणि याचा उपयोग इतर क्षेत्रांमध्येही करता येईल कारण याद्वारे पर्यावरण पूरक गोष्टींचा पुरस्कार केला जातोय.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांचे महसूल मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री ही कारकीर्द खऱ्या अर्थाने चमकदार ठरलेली आहे. महसूल विभागाद्वारे सातबारा उताराचे डिजिटायझेशन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे हरित इमारत संकल्पना त्यांच्या कारकिर्दी मधील महत्वाचे हे मुद्दे ठरतात. आम्ही या कार्यक्षम, उत्पादनशील ,आणि नाविन्यपूर्ण सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना आमच्या शुभेच्छा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी देतो.
Comments
Post a Comment