सौर ऊर्जा: शेतीसाठी एक मुबलक ऊर्जा स्त्रोत


सौर ऊर्जा हा ऊर्जेचा असा स्त्रोत आहे जो मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्याच्या वापराविषयी नेहमीच जनजागृती केली जाते. सुदैवाने भारताच्या ट्रॉपिकल हवामानामुळे भारतामध्ये सौर शक्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर करणे शक्य आहे. माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतेच कोल्हापूर येथे एका सौरशक्ती प्रकल्पाचे लोकार्पण केले हा प्रकल्प 2.4 मेगावॅट क्षमतेचा असून सरकारी योजना "मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी" द्वारे  निर्माण करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की शेतकऱ्यांना आणि उद्योगांना रास्त दरामध्ये विज  उपलब्ध करून द्यायची असेल तर सौरऊर्जेला पर्याय नाही, तसेच सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये सरकारचे वाढते योगदान शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर ठरेल.

नुकतेच माननीय महसूल मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी एका सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याला कोल्हापूर येथे उपस्थिती लावली. हा प्रकल्प 2.42 मेगावॅट क्षमतेचा असून या प्रकल्पाअंतर्गत केंद्र शासनाने . . एस. एल. कंपनी सोबत करार केलेला आहे. या प्रकल्पामुळे गडहिंग्लज आणि हलकर्णी या गडहिंग्लज तालुक्यामधील आणि शिनोली या चंदगड तालुक्यामधील गावांमध्ये 1 मेगावॅट, 0.7 मेगावॅट आणि 0.5 मेगावॅट क्षमतेचे छोटे सौरऊर्जा प्रकल्प उभे राहणार आहेत ज्यांचा फायदा या भागातील 500 शेतकऱ्यांना पाण्याच्या पंपासाठी होईल.
सौर ऊर्जा  प्रकल्पाच्या लोकार्पण  सोहळ्याला म्हाडाचे अध्यक्ष श्री. समरजित सिंह घाडगे, आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, आमदार श्री. हसन मुश्रीफ, श्रीपतराव शिंदे, गडहिंग्लजच्या  नगराध्यक्षा स्वाती  कोरी,हलकर्णी सरपंच श्रीमती विलासमती  शेरवि, शिनोली  सरपंच श्रीमती नम्रता पाटील, महावितरण प्रमुख अभियंता श्री. अनील भोसले,प्रभारी अधीक्षक अभियंता श्री. सागर मारुलकर, कार्यकारी अभियंता श्री. सुरेंद्रनाथ भोये. . एस. एल. कंपनी संचालक श्री. व्यंकटेश दिवेदी आणि विभागीय संचालक श्री. दीपक कोकाटे उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान माननीय पालकमंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की कोळसा आणि इतर पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या कमतरतेमुळे आपले या पारंपरिक ऊर्जा स्त्रोतावरील अवलंबित्व कमी करण्याची वेळ आलेली आहे. पाण्याचा वापर करून विद्युत निर्मितीला ही मर्यादा आहेतच, त्यामुळे ऊर्जेचा आत्ता मुबलक प्रमाणात असलेला स्त्रोत म्हणजे सौर उर्जा आहे आणि तो 365 दिवस उपलब्ध असतो. तसेच सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी फक्त एक वेळेस गुंतवणूक करावी लागते. जर सरकारने सौरऊर्जा प्रकल्पांमधील गुंतवणूक आणि योगदान वाढवले, तर त्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना  शेतीसंदर्भातील विविध प्रक्रियांसाठी नक्कीच होईल.
सरकारी योजना "मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी" सौरऊर्जेचा पुरस्कार करते आणि या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने . . एस. एल. कंपनी बरोबर एक करार झालेला आहे. या करारानुसार दोनशे मेगावॅट विद्युत निर्मिती अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या लोकार्पण समारंभाला माननीय महसूल मंत्री  चंद्रकांत दादा पाटील यांनी अधोरेखित केले

 सरकारची विविध कार्ये, संशोधन निश्चितच प्रशंसनीय आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून  श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी सरकारी इमारतींसाठी हरित इमारती अशी संकल्पना विकसित केली आहे. या संकल्पनेअंतर्गत  सरकार इमारतीच्या छतावर सोलर पॅनल  यंत्रणा बसवण्यात येते ज्याद्वारे या सौर ऊर्जेचा वापर दिवे आणि इतर उपकरणांसाठी होत आहे. श्री. चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्र स्टेट कॅबिनेटचे सर्वात प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण विचारधारा असलेले मंत्री आहेत आणि त्यांची नेतृत्व शैली महाराष्ट्राला खूप सकारात्मक रीतीने बदलत आहे.


Comments

Popular posts from this blog

“Karkarta Karta-Dharta” Movement—A Huge Success

सोसायट्यांचे पुनर्निर्माण-- कोथरूडच्या विकासाची किल्ली

Press Conference at Kolhapur- Chandrakant Patil