जम्मू - काश्मीर विषयी निर्णयावर प्रतिक्रिया
दिनांक पाच ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 आणि 35-ए बरखास्त केल्यामुळे जम्मू-काश्मीर संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. त्यानुसार जम्मू-काश्मीर आता दोन केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाख मध्ये विभाजित करण्यात आले आहे. सतत आठ तासाच्या लोकसभेतील संसदेतील चर्चेनंतर या ऐतिहासिक आणि अत्यंत महत्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी जम्मू-काश्मीरमध्ये करण्यात आली.
कलम 370 आणि 35-ए हटवून बीजेपी सरकारने अत्यंत विश्वासार्ह पाऊल पुढे टाकलेले आहे. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी आणि गृहमंत्री श्री.अमित शहा यांनी त्यांच्या वचन पूर्ततेची अंमलबजावणी यानिमित्ताने केलेली आहे. विशेष म्हणजे या निर्णयाला इतर अनेक राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे ज्यामध्ये आम आदमी पार्टी, तेलुगु देसम पार्टी अशा पक्षांनी देशहिताला देशहिताला प्राधान्य देऊन बीजेपीला साथ दिली.
अगोदर ट्रिपल तलाक कायदा आणि त्यानंतर आता कलम 370 चे काढणे हे मोदी सरकारचे भव्य यश म्हणावे लागेल. या निर्णयामुळे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झाले आहेत आणि विविध माध्यमांमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
माननीय महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनीदेखील माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी आणि माननीय गृहमंत्री श्री अमित शहा जी यांना या ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयाबद्दल आभार व्यक्त करून अभिनंदन केले आहे. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हिंदी भाषेमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्याद्वारे त्यांनी या निर्णयाच्या शिल्पकारांचे अभिनंदन केले आहे.
यामध्ये श्री चंद्रकांत दादा पाटील असे म्हणतात की भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली परंतु सत्तर वर्षापासूनचे आपले एक अधुरे स्वप्न आता पूर्ण झालेले आहे. हा दिवस जगभरातील सर्वच भारतीयांसाठी एक खास दिवस राहील. तसेच या निर्णयाद्वारे सरकारने स्वर्गीय शामाप्रसाद मुखर्जी यांनाही योग्यरीतीने श्रद्धांजली दिलेली आहे. या निर्णयामुळे जम्मू काश्मीर मधील परिस्थिती सुधारून ,राहणीमानाचा दर्जा उंचावून तेथील जनतेला भारताच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य होईल. या कलमाविषयी घेतलेले निर्णय सोपे नव्हते तर फक्त माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्री या गोष्टी करू शकतात.
श्री पाटील पुढे म्हणतात की की ते स्वतः कोणी इतके मोठे व्यक्ती नाहीत की माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचे त्यांनी त्यांनी अभिनंदन करावे, परंतु या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व निर्णयासाठी त्यांना कृतज्ञता आणि आभार व्यक्त करावे वाटते. तसेच या निर्णयाकडे ते बीजेपीची व्यक्ती म्हणून पाहत नाहीत तर भारताचा सामान्य नागरिक म्हणून पाहतात. या निर्णयातून त्यांनी माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची तुलना स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी करून त्यांना लोह-पुरूष म्हटले आहे.
श्री चंद्रकांत
दादा पाटील यांनी त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट वर या निर्णयाविषयी अधोरेखित केलेले आहे. 2019 च्या निवडणूक मोहिमांमध्ये कलम 370 हा नेहमीच महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. या निर्णयाद्वारे देशांमध्ये शांतता, सुरक्षितता, आणि समानता यांच्या अंमलबजावणीस मदत होईल. तसेच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांची कार्यक्षम नेतृत्व शैलीही येथे अधोरेखित होते.
Comments
Post a Comment