कलम 370 आणि 35 A यांच्यासंदर्भात चर्चासत्र


राजकारणी व्यक्तींमध्ये अभिनव विचार शैली आणि नाविन्यता दुर्मिळतेनेच पाहायला मिळते परंतु जेव्हा महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांचा विचार येतो तेव्हा त्यांच्या विचारधारेमध्ये, कार्यक्रमांच्या योजनांमध्ये नेहमीच कल्पकता आणि आणि अभिनव विचार शैली दिसून येते. नुकतेच पुण्यातील नागरिकांना या गोष्टीचा प्रत्यय आला असेल. पुणे येथे महायुतीचे कोथरूड येथील उमेदवार आणि बीजेपी महाराष्ट्र अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एका वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम म्हणजे जम्मू-काश्मीरमधील आर्टिकल्स 370 आणि 35 यांच्या संदर्भात घेतल्या गेलेल्या निर्णयावर आयोजित केलेले एक चर्चासत्र होते.

महायुतीचे कोथरूड येथील उमेदवार श्री चंद्रकांत दादा पाटील तसेच लडाखचे  खासदार श्री नामग्याल  आणि पुण्याचे खासदार श्री गिरीश बापट यांनीही या चर्चासत्रात सहभाग घेतला होता.
या चर्चासत्रादरम्यान श्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की कलम 370 काढणे हा नेहमीच आमच्या श्रद्धेचा विषय राहिलेला आहे. जनसंघाचे संस्थापक आणि प्रख्यात मार्गदर्शक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी "एक देश मे दो निशान तो संविधान नही चलेगा" असे म्हणत या मागणीसाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले होते. याचदरम्यान त्यांना अनेकदा अटकही झाली होती आणि श्रीनगर लाल चौक येथे तिरंगा फडकवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनेही केली होती.
या चर्चासत्रामध्ये श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कलम 370 संदर्भात त्यांच्या काही वैयक्तिक गोष्टींवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की जेव्हा ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते तेव्हा त्यांनी कलम 370 काढण्यासंदर्भात एका आंदोलनाला सुरुवात केली होती आणि पुढे त्यांना या आंदोलनासाठी अटकही झाली होती. त्यानंतर या सर्व सदस्यांनी तत्कालीन पंतप्रधान श्री वि पी सिंह यांची भेट घेऊन त्यांना तिरंगा दिला होता आणि श्रीनगर लाल चौक येथे तिरंगा  फडकवण्याची विनंती केली होती.  
या चर्चासत्रादरम्यान माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांची या अनेक वर्षांच्या  मागणीची पूर्तता केल्याबद्दल भरभरून स्तुती केली आणि त्यांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले की माननीय पंतप्रधानांनी कलम 370 आणि 35 A काढल्यामुळे सर्वच भारतीयांनी त्यांचे अभिनंदन केले आहे आणि या निर्णयाची  स्तुती केली आहे कारण शेवटी हा निर्णय देशाच्या एकात्मकता आणि सुरक्षा या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
या  चर्चासत्रामध्ये दरम्यान लडाखचे खासदार श्री नामग्याल यांनी परखडपणे काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. ते म्हणाले की कलम 370 काढण्याच्या  निर्णयानंतर अनेकांना मानवतावादी विचार सुचत आहेत. परंतु जेव्हा खरोखर कश्मीरमधील लोक नरक यातना सहन करीत होते तेव्हा यूपीए  सरकारची भूमिका काय होती आणि हा मानवतावाद तेव्हा कुठे होता?
माननीय बीजेपी अध्यक्ष महाराष्ट्र श्री चंद्रकांत दादा पाटील हे  राजकारणामध्ये सक्रिय असूनही जास्त त्यांच्या समाजकारणासाठी आणि विविध समाजोपयोगी कामांसाठी ओळखले जातात. अशा पद्धतीच्या चर्चासत्रामध्ये  त्यांचा सहभाग हा निश्चितच स्तुत्य, मार्गदर्शक, आणि प्रोत्साहनकारक आहे. या माध्यमातून श्री पाटील यांनी कलम 370 रद्द करण्याच्या मार्गातील त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर ही प्रकाश टाकलेला आहे .तसेच लडाखच्या खासदारांचा या कार्यक्रमातील उपस्थिती प्रशंसनीय आहे, कारण अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे ज्ञानाची देवाणघेवाण आणि विचारांचे आदान-प्रदान उत्कृष्ट पद्धतीने होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या विचार शैलीतील नाविन्यता आणि त्यांची अभिनव विचारप्रणाली याद्वारे स्पष्ट केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

High Priority to The Completion of Pending Highway Works

Press Conference at Kolhapur

Statement on Pune’s 8 Vidhan Sabha Constituencies