शेतकरी कुटुंबियांसाठी विविध योजना


महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी  नुकतीच एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश शेतकरी कुटुंबातील महिलांचे सबलीकरण करणे हा होता. या कार्यक्रमादरम्यान 412 शेतकरी कुटुंबातील महिलांना पेरणीसाठी बियाण्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान माननीय महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बीजेपी सरकारच्या विविध योजना ज्या प्रामुख्याने शेतकरी कुटुंबांना अधिक सशक्त करण्यासाठी तसेच शेतकरी कुटुंबातील शिक्षण प्रक्रियेसाठी आणि  त्यांचे उत्पन्न अधिकाधिक वाढवण्यासाठी सरकारच्या दृष्टीने आखण्यात येत आहेत त्यांच्याविषयी भाष्य केले.  

फिनोलेक्स फाउंडेशन, पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन, तसेच एफ आय सी सी आय पुणे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमध्ये शेतकरी कुटुंबातील महिलांना सोया आणि तूर डाळीचे बियाण्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या इतर आयोजकांमध्ये साई मित्रपरिवार पुणे, पर्याय सामाजिक संस्था कळंब, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर इत्यादींचा समावेश होता. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांना त्यांच्या यजमानांच्या दुर्दैवी निधनानंतर उभारी देणे तसेच सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये त्यांची मदत करणे असा होता. या कार्यक्रमादरम्यान श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते 30 किलो सोयाबीन आणि एक किलो तूर डाळ यांचे वाटप 412 शेतकरी कुटुंबातील महिलांना करण्यात आले.  
माननीय महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या कार्यक्रमादरम्यान अत्यंत संवेदनशील पद्धतीने भाषण केले. ते म्हणाले की आपण मराठी ग्रामीण लोक आहोत आणि आपल्याला दानधर्माचा माध्यमातून आलेल्या गोष्टी आवडत नाहीत. दुर्दैवाने सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि नैसर्गिक संकटे पाठ सोडत नसल्यामुळे या परिस्थितीमध्ये शेतकरी कुटुंबीयांना मदत करता यावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या परिस्थितीवर मात करण्यासाठी  सरकारने  रेन वॉटर हार्वेस्टिंगचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत ज्याद्वारे पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवला जाईल. त्याचप्रमाणे विविध पाणी संधारणाच्या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यांमध्ये चांगली परिस्थिती निर्माण होत आहे. तसेच जास्तीत जास्त उत्पादन शेतीमधून मिळवण्याचा प्रयत्न दरवर्षी केला जात आहे आणि सरकार या उत्पादनाला योग्य भाव देण्यास कटिबद्ध आहे.
माननीय कृषिमंत्री श्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की आपली कृषी व्यवस्था फक्त पारंपरिक तंत्रज्ञानावर अवलंबून आहे परंतु आता या गोष्टी बदलण्याची वेळ आलेली आहे. कृषी विज्ञान केंद्र यांनी केलेले विविध प्रयोग तसेच फिनोलेक्स पाईप आणि मुकुल माधव फाउंडेशन यांनी शेतकऱ्यांना विविध माध्यमातून मदत केलेली आहे. तरीही दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रकार झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी वाढलेली आहे. या सर्व महिलांना आता त्यांच्या क्षमतेला दुप्पट करून ही शक्ती त्यांच्या कुटुंबीयांच्या भल्यासाठी वापरण्याची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार या महिलांची पूर्णपणे मदत करेलच तसेच त्यांच्या मुलांची शिक्षणही सुव्यवस्थितरित्या पार पडण्याची काळजी सरकार घेत आहे.
या कार्यक्रमादरम्यान श्रीमती धोंडाबाई निमगुळे यांनी आयोजकांचे आभार मानले आणि म्हणाल्या की यावर्षी पेरणी विषयी आम्ही निराशजनक स्थितीमध्ये होतो, कारण पुरेसे पैसे उपलब्ध नव्हते. परंतु आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून बियाणे वाटप झाल्यामुळे पेरणीची प्रक्रिया सोपी होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन कळम, उस्मानाबाद जिल्हा येथे करण्यात आले होते आणि या कार्यक्रमाला इतर उपस्थितांमध्ये फिनोलेक्स संस्थेचे ट्रस्टी श्रीमती रितु प्रकाश छाबरिया, आमदार सुजित सिंग ठाकूर, फिनोलेक्स व्हाईस प्रेसिडेंट बि. आर. मेहता, श्रीमती अनिता सणस, श्री बाबू मोकळे- मुकुंद माधव फाउंडेशन, श्री पराग सोमण अप्पर जिल्हाधिकारी, श्री विश्वास तोडकर -पर्याय संस्था ,श्री सचिन कुलकर्णी, श्री मंगेश तळेकर आणि श्री अमोल ठाकरे इत्यादी उपस्थित होते.
माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील हे राजकारणातील एक अत्यंत संवेदनशील व्यक्ती मानले जातात. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी महिलांना आधार देऊन त्यांची सामाजिक जबाबदारी  अधोरेखित केली आहे. आम्हाला असे वाटते की श्री चंद्रकांत दादा पाटील यांना त्यांच्या भविष्यातील सर्वच कार्यांमध्ये यश प्राप्त व्हावे जेणेकरून अशा सर्व कुटुंबांना मुलांची शिक्षणे, शेतीमालाला भाव, कर्जमाफी अशा सर्वच दृष्टीने मदत होईल आणि त्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील शेतकरी सुखी ,आनंदी, समाधानी ,आणि समृद्ध होण्यास मदत होईल अशा प्रकारचे दुर्दैवी प्रकार पुन्हा महाराष्ट्रात घडणार नाहीत. 


Comments

Popular posts from this blog

High Priority to The Completion of Pending Highway Works

Press Conference at Kolhapur

Statement on Pune’s 8 Vidhan Sabha Constituencies