नव्या पर्वाची सुरुवात करण्याचा मजबूत निर्धार


महाराष्ट्राचे बीजेपी अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतीच एका हिंदी दैनिकाला मुलाखत दिली, या मुलाखतीदरम्यान त्यांनी बीजेपीला पुन्हा एकदा मोठे यश आगामी निवडणुकांमध्ये संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याचप्रमाणे सध्याच्या पूरपरिस्थितीमध्ये राज्य सरकारने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांवर ही त्यांनी भाष्य केले.

जेव्हा श्री चंद्रकांत दादा पाटील यांना बीजेपीच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीविषयी विचारले त्यावेळी ते उत्तरले की बीजेपी पुन्हा एकदा मोठ्या फरकाने निवडणुकांमध्ये भव्य यश संपादन करण्यास पूर्णपणे तयार आहेबीजेपीच्या धोरणांची आखणी नेहमीप्रमाणे अगोदरच झालेली असते आणि त्यानुसार निवडणूक मोहिमांच्या कामाला सुरुवात होते. यावेळी ही  आमचे ध्येय सुस्पष्ट आहेत त्यानुसार प्रत्येक बुथमध्ये तयारी सुरू झालेली आहे आणि सर्वच बीजेपीचे कार्यकर्ते यावेळी पक्षाच्या यशासाठी उत्साहाने कार्यरत आहेत.  
श्री पाटील यांना बीजेपी-शिवसेना युती बद्दल विचारले असता ते म्हणाले की शिवसेनाही बीजेपीसाठी नेहमीच मित्र पक्ष राहिला असून त्यांची विचार धारणा एकमेकांना पूरक आणि समान आहे. सध्या शिवसेना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सोबत आहे. या दोन्ही पक्षांमधील केमिस्ट्री अत्यंत चांगली आहे.
विधानसभा निवडणुकांमध्ये 220 जागा जिंकण्याविषयी विचारले असता श्री चंद्रकांत पाटील म्हणाले की या देशाला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी आणि माननीय गृहमंत्री श्री अमित शहा एका वेगळ्या नेतृत्व शैलीच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टीने बदलत आहेत. त्यांच्या प्रभावी नेतृत्व शैलीमुळे बीजेपीला महाराष्ट्रात नक्कीच यश मिळणार आणि याबाबत सर्वांना तशी खात्री आहे. त्याचप्रमाणे बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वास आहे की महाराष्ट्रात बीजेपीला 220 जागा निश्चितच प्राप्त होणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कार्य पार पाडली आहेत. ते त्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये अत्यंत यशस्वी ठरले आहेत आणि या सर्व परिस्थितीमध्ये 220 जागा जिंकणे हे फारसे अवघड असणार नाही.
श्री पाटील यांना महाराष्ट्राच्या पुढच्या मुख्यमंत्री बद्दल विचारले असता तसेच शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्याच्या संदर्भात विचारले तेव्हा त्यांनी या विषयाला बगल दिली आणि ते म्हणाले की यासंदर्भात बोलण्यासाठी ते योग्य व्यक्ती नसून जेव्हा जागावाटपाचा विषयी निश्चित बातमी हाती येईल तेव्हा त्या विषयावर बोलणे योग्य ठरेल.
श्री चंद्रकांत दादा पाटील यांना बीजेपीच्या निवडणूक मोहिमा आणि मार्केटिंग अजेंडा विषयी विचारले असता ते म्हणाले की माननीय पंतप्रधान यांच्या विश्वासार्ह, सकारात्मक नेतृत्वशैलीमुळे लोकांनी त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून पसंत केले. त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही उत्कृष्ट कार्य केल्यामुळे लोकांची मने जिंकलेली आहेत. प्रामाणिकपणा आणि विविध विकास कार्ये हीच बीजेपीची सर्वात मोठी ताकदीची बाजू आहे.
श्री पाटील यांना कलम 370 विषयी विचारले असता ते म्हणाले की हा निर्णय कोणत्याही पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी घेतलेला नसून हा निर्णय देशाच्या सुरक्षा आणि विकासाशी संदर्भात आहे. काँग्रेसला मागच्या सत्तर वर्षात जे करता आले नाही ते बीजेपी सरकारने दुसर्या इनिंगच्या 70 दिवसांमध्ये साध्य केले. त्याचप्रमाणे यामधून अजून एक महत्त्वाचा संदेश मिळतो की सध्याचे सरकार हे देशाच्या प्रतिष्ठेच्या आणि सुरक्षेच्या बाबतीत कुठेही तडजोड करणार नाही.
बीजेपीमध्ये सहभागी होणाऱ्या अन्य पक्षांच्या नेत्यांविषयी विचारले असता श्री पाटील म्हणाले म्हणाले की महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांची समीकरणे नेहमीच बदलत राहतात. त्याचप्रमाणे बीजेपी ही सध्या सर्वात मोठी आणि विश्वासार्ह राजकीय पार्टी असल्यामुळे निश्चितच इतर पक्षांच्या नेत्यांना बीजेपी सोबत यावेसे वाटते.
जेव्हा श्री चंद्रकांत दादा पाटील यांना राज्य सरकारच्या पूरग्रस्त भागातील उपाययोजनांवर विचारले तेव्हा ते उत्तरले की राज्य सरकार आणि केंद्र सरकार पूरग्रस्त लोकांना जास्तीत जास्त मदत पुरवण्यासाठी सकारात्मक असून रुपये 6813 करोड इतके इतक्या निधीची उपलब्धता कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, आणि कोकण भागासाठी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या कठीण परिस्थितीमध्ये आर्मी, एन डी आर एफ, पोलीस, रेल्वे, नेव्ही इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले आणि लोकांना वैद्यकीय सुविधा, अन्न, निवारा, कपडे, आणि आर्थिक मदत प्राप्त करून दिली.
माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मोठे यश संपादन करण्याचा मजबूत इरादा या मुलाखतीच्या माध्यमातून स्पष्ट झालेला आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाची आगामी निवडणुकांसाठी धोरणे आणि निवडणूक मोहीम सुरू झालेली आहे. निवडणुकांनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.

Comments

Popular posts from this blog

Press Conference at Kolhapur- Chandrakant Patil

सोसायट्यांचे पुनर्निर्माण-- कोथरूडच्या विकासाची किल्ली

Positive Communication with Oil Companies for Gas/Stoves and Cylinder Availability