शिवसेना आणि बीजेपी युतीमध्ये योग्य समन्वय आणि सुसंवाद
महाराष्ट्रात राज्याच्या निवडणुका ऐरणीवर असताना महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. त्याचप्रमाणे काही अफवाही जोर धरू पाहात आहेत, नुकतीच एक महत्त्वाची अफवा म्हणजे बीजेपी-शिवसेना युती तुटणार का ? यावर, ताबडतोब बीजेपी अध्यक्ष, महाराष्ट्र माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले की बीजेपी-शिवसेना युती मजबूत आहे आणि ही युती हीच राज्यातील सर्वात मोठी राजकीय पार्टी असेल. तसेच माध्यमांमध्ये पसरविल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या बातम्या अत्यंत चुकीच्या असून लवकरच शिवसेना आणि बीजेपी मध्ये जागांच्या निर्णयाविषयी संवादांमधून पावले उचलली जातील.
महसूल मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वाई शहरांमध्ये काही दिवसांपूर्वी विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभ आणि विजय संकल्प बूथ मेळाव्याला उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला बीजेपी जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, किसनवीर फॅक्टरीचे अध्यक्ष आणि माजी आमदार मदन भोसले, नगराध्यक्षा डॉक्टर प्रतिभा शिंदे, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर आणि वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत काळे देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की येत्या निवडणुकांसाठी जागावाटप आणि पुढच्या घडामोडी शिवसेनेबरोबर संवाद आणि चर्चेनंतर स्पष्ट होतील. सध्या वाई मतदारसंघ शिवसेनेकडे आहे परंतु येत्या निवडणुकांच्या माध्यमातून आम्ही तो बीजेपीकडे आणण्याचा प्रयत्न करू. बीजेपीच्या नेत्यांना विश्वासही आहे की श्री मदन भोसले येथे भव्य यश संपादन करतील. श्री पाटील पुढे म्हणाले की सध्या बीजेपीकडे राजकीय नेत्यांचा वाढलेला आहे आणि लोकांच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत. पुढच्या आठ दिवसात महाराष्ट्राची बरीच राजकीय समीकरणे बदलतील.
आपल्या भाषणादरम्यान महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केंद्र आणि राज्य शासनाने हाती घेतलेल्या विविध विकासकामांच्याविषयी भाष्य केले. तसेच पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकारने वापरलेल्या विविध उपाय योजनांची माहिती दिली. श्री चंद्रकांत पाटील यांच्या मते सरकारने या प्रतिकूल परिस्थितीत लोकांना आधार देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तसेच राज्य शासन केंद्रातून जास्तीत जास्त मदत पूरग्रस्तांसाठी मिळवण्यास प्रयत्न करीत आहे. लवकरात लवकर पूरग्रस्त भागातील शाळांची पुनर्बांधणी आणि इतर जीवन सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न प्राधान्याने सुरू राहील. त्याचप्रमाणे 2022 पर्यंत बीजेपी सरकारचा संकल्प आहे की सर्वांना घर आणि शुद्ध पाण्याचे पिण्याचे पाणी उपलब्ध होईल.
माजी आमदार श्री मदन भोसले यावेळी म्हणाले की महाबळेश्वर आणि पाचगणी शहरांना आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ अशी ख्याती मिळावी यासाठी सरकारने प्रयत्न करावे. तसेच त्यांनी सांगितले की वाई शहरातील विविध विकास कामांसाठी निधीची आवश्यकता असेल. या कार्यक्रमादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला.
येत्या निवडणुकांमध्ये बीजेपी आणि शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये अपेक्षित यश मिळेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तसेच त्यांची धोरणे आणि योजना गुप्त असून अनेक मास्टरस्ट्रोक अचानक विरोधी पक्षांना त्रस्त करतात. थोडक्यात काय, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला येत्या विधानसभा निवडणुकांचा सीझन अनुकूल दिसत नाही. महाराष्ट्र बीजेपी अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानसभा निवडणुका स्वतःला झोकून दिले आहे आणि त्यामुळे कदाचित लोकसभा निवडणुकांच्या प्रमाणेच निकाल हाती येऊन पुन्हा एकदा इतिहास रचला जाईल.
Comments
Post a Comment