बीजेपी अतिरिक्त अधिकाऱ्यांसोबत सोबत बैठक


यंदा झालेल्या लोकसभा निवडणुका दरम्यान बीजेपीने माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक यशस्वी रणनीती आखली होती जिची धुरा पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रामुख्याने महसूल मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सार्थपणे सांभाळली. लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात श्री चंद्रकांत दादा पाटील यांना मिळालेल्या नेत्रदीपक यशामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांची जबाबदारी निश्चितच वाढलेली आहे. त्यांची नुकतीच झालेली  बीजेपी महाराष्ट्र अध्यक्ष आणि पुणे जिल्हा पालकमंत्री अशी नियुक्ती या  दोन्ही गोष्टी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  महत्वाच्या आहेत.

महाराष्ट्र बीजेपी अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बीजेपीच्या कार्यकर्त्यांना आणि आणि नेत्यांना आगामी  विधानसभा निवडणुकांसाठी परिपूर्ण तयारी करण्याचे आवाहन केलेले आहे. श्री पाटील यांनी बीजेपीच्या अतिरिक्त अधिकाऱ्यांबरोबर नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी बीजेपी अध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्य मंत्री आशिष शेलार ,आणि मुंबई बीजेपी अध्यक्ष मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते.
महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यावेळी म्हणाले की या पाच वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंट मध्ये पन्नास हजार करोडपेक्षा अधिक रुपये पैसे जमा करण्यात  आलेले आहेत. पुढे त्यांनी आश्वस्त केले की त्यांच्या बीजेपी अध्यक्ष या नव्या कारकिर्दीमध्ये ते बीजेपी बरोबर तत्वनिष्ठ राहतील आणि आणि त्यांच्या वर्तणुकीतून बीजेपीला पुढे बोलण्याची संधी कुणालाही मिळणार नाही. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या निवडणूक मोहिमेची आखणी केली होती आणि त्यांच्या धोरणात्मक नियोजनामुळे 2014 मध्ये राज्यात बीजेपीला भव्य यश मिळाले. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकांच्या माध्यमातून पुन्हा शिरपेचात मध्ये मानाचा तुरा खोवला  गेला आणि आता येत्या विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून बीजेपीला पुन्हा एकदा मोठे यश नक्की मिळणार आहे.
पुढे श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विरोधी पक्षाचा समाचार घेताना असे प्रतिपादन केले की जर विरोधी पक्षांना ईव्हीएम प्रणाली सदोष वाटते तर सुप्रिया सुळे बारामतीमधून कशा काय जिंकल्या आणि असे असेल तर त्यांनी लवकरात लवकर राजीनामा देणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले की बीजेपी कोणत्याही विरोधी पक्षांमुळे जिंकत नाही तर बीजेपीच्या योजना, धोरणे, बूथ सिस्टीम , आणि विश्वासार्ह नेतृत्व शैली या सर्व गोष्टी येथे महत्वाच्या ठरतात.
या बैठकीदरम्यान माजी बीजेपी अध्यक्ष श्री रावसाहेब दानवे यांनी विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रशंसा करून त्यांचा श्री पाटील यांच्यावरील विश्वास आणि अपेक्षा दर्शविल्या. ते म्हणाले की महाराष्ट्र बीजेपीचा ताबा आता श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हाती आलेला आहे. त्यांच्या प्रगाढ अनुभवाचा बीजेपीला निश्चितच फायदा होईल. ते पुढे म्हणाले बीजेपी ही एकमेव हा एकमेव राजकीय पक्ष असा आहे जो नेतृत्व शैली,हुशारी , आणि सामान्य जनता यांना प्राधान्य देतो आणि म्हणूनच आज या देशाला एक सामान्य माणसांचा प्रतिनिधी नेतृत्व प्रदान करीत आहे.
लोकसभा निवडणुकांच्या माध्यमातून यंदा अर्धे काम झालेले आहे तर बाकीचे मिशन विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होईलआगामी विधानसभा निवडणुकांनंतर पुढील पाच वर्षांचा रोडमॅप विविध सुविधा, विकास कामे आणि प्रगती या दृष्टीने सुकर होईल. श्री चंद्रकांत दादा पाटील यांची भूमिका विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या मार्गदर्शक नेतृत्व शैली आणि प्रगल्भ अनुभव यामुळे महत्त्वाची ठरणार असून ते नक्कीच त्याला शंभर टक्के न्याय देतील.

Comments

Popular posts from this blog

“Karkarta Karta-Dharta” Movement—A Huge Success

सोसायट्यांचे पुनर्निर्माण-- कोथरूडच्या विकासाची किल्ली

Press Conference at Kolhapur- Chandrakant Patil