येत्या पंधरा वर्षात सत्तापालट होणार नाही-- श्री चंद्रकांत पाटील


सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांसाठी तयारी झालेली आहे आणि विविध निवडणूक मोहिमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या कशामुळे यशामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या  आत्मविश्वासात निश्चितच वाढ झालेली आहे आणि ही गोष्ट विविध सभा- मोहिमा यामधून प्रकर्षाने दिसून येते. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाजनादेश यात्रेचे नियोजन केले होते. या यात्रेचा मुख्य उद्देश  बीजेपीच्या कार्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे तसेच या निवडणुकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन करणे असा आहे. महसूल मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील हे देखील निवडणूक मोहिमांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यस्त आहेत. त्यांच्याच हस्ते महाजनादेश यात्रेच्या  लोगोचे  उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी बीजेपीच्या विजयी निर्धार विषयी भाष्य केले.

श्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये बीजेपी-शिवसेना सरकारने विविध जनहिताच्या कार्याच्या माध्यमातून लोकांचा विश्वास जिंकलेला आहे. त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते आणि नेते यांचा बीजेपीमध्ये समावेश झालेला आहे. या सर्व गोष्टी बीजेपीसाठी अत्यंत अनुकूल असून येत्या पंधरा वर्षात महाराष्ट्रात सत्तापालट होणार नाही असे म्हटल्यास त्यात काही वावगे ठरणार नाही. पुढची कमीत कमी पंधरा वर्षे तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात सत्ता मिळणार नाही.  
महाजनादेश यात्रेच्या लोगो लॉंच कार्यक्रमादरम्यान  माननीय महसूल मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले की राज्यामध्ये  सिंचनाखालील क्षेत्र 34 लाख हेक्टर पासून 40 लाख हेक्टर इतके वाढले आहे. त्याचबरोबर सध्या महाराष्ट्र राज्य अनेक क्षेत्रांमध्ये विकासाची उत्तुंग उंची अनुभवत आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्ही नागरिकांना बीजेपी सरकारच्या विविध योजनांचा फायदा झालेला आहे. त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते आणि नेते बीजेपीमध्ये येण्यास उत्सुक आहेत, या सर्व गोष्टी आज पार्टीला मजबूत बनवत असून येत्या पंधरा वर्षात महाराष्ट्रात सत्तापालट होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. अनेक पक्षाच्या नेत्यांनी बीजेपी बरोबर हातमिळवणी करण्यास करण्याची तयारी दाखवली आहे आणि या नेत्यांना ही कल्पना आहे की बीजेपी हा असा पक्ष आहे जिथे घाणेरड्या राजकारणाला प्रवेश नाही.  
श्री पाटील पुढे म्हणाले  माजी राज्यपाल आणि माजी मंत्री माननीय श्री राम नाईक हे देखील राजकारणात पुन्हा सक्रिय सहभाग घेण्यास उत्सुक आहेत येत्या गुरुवारी ते बीजेपी मध्ये प्रवेश करतील. या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे लोकसभा निवडणुकादरम्यान असणारे योगदान अनन्यसाधारण होते. त्याला अनुसरून येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्यावरील जबाबदारी निश्चितच वाढलेली आहे. श्री चंद्रकांत दादा पाटील हे तज्ञ अनुभवी नेते, प्रामाणिक व्यक्ती आणि बीजेपीचे अत्यंत मेहनती असे कार्यकर्ते असून त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने आखणी करण्यास सुरुवात केलेली आहे. याच धर्तीवर श्री चंद्रकांत दादा पाटील यांची झालेली बीजेपी अध्यक्ष महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अशी नेमणूकही महत्त्वाची ठरते. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर चित्र स्पष्ट होईल आणि आणि पुन्हा बीजेपीच्या नव्या अध्यायाची सुरुवात राज्यामध्ये होईल.

Comments

Popular posts from this blog

“Karkarta Karta-Dharta” Movement—A Huge Success

सोसायट्यांचे पुनर्निर्माण-- कोथरूडच्या विकासाची किल्ली

Press Conference at Kolhapur- Chandrakant Patil