माननीय पंतप्रधानांच्या महाराष्ट्र बीजेपी अध्यक्षांना शुभेच्छा


महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र बीजेपी अध्यक्ष अशी नियुक्ती झाली. या निर्णयामुळे श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या जबाबदारी आणि भूमिकेमध्ये निश्चितच वाढ झालेली आहे आणि एक प्रकारे त्यांच्या भूमिकेमध्ये वाढ करून पक्षाकडून त्यांना पोचपावती मिळाली आहे असे म्हणावे लागेल. माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील  यांची राजकीय कारकीर्द नेहमीच प्रेरणादायक राहिली असून ते कोल्हापूर जिल्ह्याचे सक्षम राजकारणी म्हणून ओळखले जातात. श्री चंद्रकांत दादा पाटील यांची भूमिका बीजेपी आणि एबीव्हीपी या दोन्हींच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये बीजेपीची मुळे मजबूत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा मानला जातो. नुकतेच भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी श्री चंद्रकांत दादा पाटील यांना त्यांच्या नव्या भूमिकेबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत तसेच  वाढलेल्या जबाबदारीचीही आठवण करून दिलेली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती दिली की माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी  त्यांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांच्यामधील दूरध्वनीवरील  संभाषणादरम्यान माननीय पंतप्रधान  म्हणाले की -- "दादा आता तुम्ही महाराष्ट्र बीजेपीचे अध्यक्ष झालेले आहात, मला विश्वास आहे की तुम्ही बीजेपीला अधिकाधिक मजबूत करण्याचा प्रयत्न राज्यामध्ये कराल, तसेच राज्यातील सांस्कृतिक चळवळ अधिक वाढवण्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू राहतील आणि त्यानुसार पुढच्या पिढीमधील सुसंस्कृत अशा तरुण कार्यकर्त्यांच्या रूपात आपण या देशाला अधिक मजबूत बनवू शकतो." अशाप्रकारे माननीय पंतप्रधानांनी श्री चंद्रकांत दादा पाटील यांना बीजेपीचे नविन अध्यक्ष महाराष्ट्र या भूमिकेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. या शुभेच्छांमुळे श्री पाटील निश्चितच भावूक झाले आणि त्यांनी पंतप्रधानांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भविष्यातही असेच कार्य सुरू ठेवण्याची ग्वाही यानिमित्ताने दिलेली आहे.
श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी येत्या विधानसभा निवडणुकांसाठीही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आखणी करण्यास सुरुवात केलेली आहे. विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्ष मोठ्या तयारीत असून बीजेपी आणि शिवसेना युतीला या निवडणुकांच्या माध्यमातून मोठे यश संपादन करायचे आहे. माननीय श्री पाटील यांच्या बीजेपी महाराष्ट्र अध्यक्ष अशा नियुक्ती नंतर कोल्हापूर शहरामध्ये त्यांच्या चाहत्यांनी आणि बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. या स्वागत  समारंभादरम्यान त्यांनी स्वर्गीय राजे राजर्षी शाहू महाराज यांना मानवंदना दिली. तसेच या वेळी अनेक मराठी घोषणांच्या रूपाने श्री चंद्रकांत दादा पाटील यांना चाहत्यांनी प्रोत्साहित केले.
कोल्हापूरच्या इतिहासामध्ये एखाद्या राजकीय नेत्याचा प्रवास प्रथमत इतका रंजक झालेला दिसतो. श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात एबीपी बीपी साठी केली जी त्यांच्यासाठी एक मोठी इनिंग होती, त्यानंतर त्यांनी बीजेपी सोबत काम करणे सुरू केले. दरम्यान ते पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणूनही निवडून आले. 2014 मध्ये त्यांच्या कारकीर्दीला कॅबिनेट मिनिस्टर म्हणून मोठा ब्रेक मिळाला आणि एकाच वेळी महसूल ,कृषी, आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. त्याचप्रमाणे पुणे, कोल्हापूर, आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असा पदभारही त्यांनी स्वीकारला आणि आता महाराष्ट्राचे बीजेपी अध्यक्ष अशा नवीन भूमिकेत ते प्रवेश करीत आहेत. श्री चंद्रकांत दादा पाटील हे नेहमीच एक अनुभवी, तज्ञ, परिपक्व ,आणि शांत स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जातात. बीजेपी महाराष्ट्र अध्यक्ष या पदासाठी ते योग्य उमेदवार आहेत आणि त्यांच्या विविध कार्यामधून ही गोष्ट अनेकदा सिद्ध झालेली आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीची यांनीही श्री पाटील यांना या नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा देऊन महाराष्ट्रात सांस्कृतिक   चळवळीवर अधिक भर दिला जावा आणि बीजेपीच्या कार्यकर्त्यांची सुसंस्कृत अशी नवी पिढी तयार व्हावी अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. आम्हीदेखील आमच्या शुभेच्छा नवनिर्वाचित बीजेपी अध्यक्ष महाराष्ट्र श्री चंद्रकांत दादा पाटील यांना या निमित्ताने देतो.

Comments

Popular posts from this blog

High Priority to The Completion of Pending Highway Works

Press Conference at Kolhapur

Statement on Pune’s 8 Vidhan Sabha Constituencies