देशाचे-स्टार्ट अप हब या सन्मानाची प्रशंसा
महाराष्ट्र मध्ये बीजेपी सरकार पाच वर्षाची कारकीर्द यशस्वीपणे पूर्ण करीत आहे आणि राज्याच्या निवडणूका आता लवकरच जाहीर होतील. तर सध्या बीजेपी त्यांच्या विविध प्रकल्प, निर्णय, आणि कार्ये यांच्यावर मतदारांच्या दृष्टीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्व माध्यमांचा उपयोग प्रचारासाठी आणि जनतेशी संपर्क करण्यासाठी होताना दिसतो ज्यामध्ये प्रामुख्याने प्रिंट मीडिया, इंटरनेट, सोशल मीडिया इत्यादींवर अधिक भर आहे. नुकतेच बीजेपी अध्यक्ष महाराष्ट्र श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ट्विटरवर बीजेपीच्या कार्याविषयी ट्विट पोस्ट केले आहे जे विविध स्टार्ट अप हब या महाराष्ट्राच्या नवीन सन्मानाविषयी प्रबोधनात्मक आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्य सरकारचे महाराष्ट्राची ओळख देशाचे स्टार्ट अप हब अशी बनवल्याबद्दल अभिनंदन केले आहे. यासंदर्भात त्यांनी आकडेवारीही दिली असून त्यानुसार देशात 21 हजार 548 स्टार्ट अप हब एका वर्षात रजिस्टर केले गेले तर त्यापैकी 8408 स्टार्ट अप हब एकट्या महाराष्ट्रात नोंदले गेले. यासंदर्भात पाटील यांनी महाराष्ट्र स्टेट इंनोवेशन सोसायटी यांच्या ट्विटर अकाउंटचा संदर्भही दिला आहे आणि या विषयीची इ सकाळ महाराष्ट्र बातमीची लिंकही सोबत दिली आहे.
या बातमीनुसार महाराष्ट्र सरकारने विविध क्षेत्रांमध्ये स्टार्टअप प्रोत्साहित केले असून यामध्ये शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, वैद्यकीय सुविधा, कृषी, एनर्जी, पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, प्रशासन, आर्थिक विकास अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रोत्साहनामुळे तरुणांना विविध स्टार्टअप कल्पनासाठी प्रेरित केले जाते ज्याद्वारे नैसर्गिक स्त्रोतांच्या योग्य वापराला प्राधान्य दिले जावे. आता मिळालेल्या घवघवीत यशाप्रमाणेच भविष्यातही बीजेपी सरकारला महाराष्ट्रातील व्यवसायाची संस्कृती स्टार्ट-अपच्या माध्यमातून पुढेही जतन करायची आहे. महाराष्ट्र स्टेट इंनोवेशन सोसायटी यांनी विविध व्यवसायाच्या संकल्पना स्टार्ट माध्यमातून पुढे आणल्या आहेत. या सोसायटी कडून तरुणांना सरकारी प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळते तसेच स्टार्ट अप फेअर आणि स्टार्ट अप सप्ताह असे अभिनव कार्यक्रमही शहरी आणि ग्रामीण भागामध्ये आयोजित केले जातात ज्याद्वारे नवनवीन संकल्पना पुरस्कृत करण्यात येते.
महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताह मधून 24 प्रकल्पांना निवडून त्यांना त्या प्रकल्पासंदर्भातील सरकारी विभागासोबत काम करण्याची संधी मिळते. मागच्या स्टार्ट अप सप्ताहाचे आयोजन जून 2018 आणि जानेवारी 2019 रोजी झाले होते. या अभियानातून 48 विजेत्यांना पायलट प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांचे बजेट पंधरा लाख रुपयांच्या आसपास होते.
महाराष्ट्र सरकारने स्टार्टअप संकल्पना प्रेरित करून उद्योग, व्यवसाय आणि त्याच्या संदर्भात संकल्पना यांना प्रोत्साहन दिले आहे ज्याद्वारे व्यवसायाच्या संकल्पना आणि त्याचे प्रॅक्टिकल ज्ञान या सर्वांची सुयोग्य सांगड घातली जाईल. माननीय महसूलमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तरुणांना नेहमीच व्यवसायासाठी प्रोत्साहित केले आहे. ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नेहमी व्यावसायिक कौशल्य विकासावर भर देऊन फक्त नोकरीऐवजी स्वतःचे युनिट काढण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करतात. महसूलमंत्र्यांनी मराठा समाजामध्ये ही व्यवसाय वाढीला विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाला व्यवसायासाठी व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा उल्लेख करावा लागेल.
महाराष्ट्र हे देशातील सर्वात विकसित आणि सर्वोत्तम राज्य म्हणून नावारूपाला येत आहे. सुदैवाने महाराष्ट्रातील तरुणांनाही विविध चांगल्या सुविधांचाही लाभ मिळताना दिसतो ज्यामध्ये प्रामुख्याने कौशल्य विकास केंद्र, इंफ्रास्ट्रक्चर, तज्ञांची मदत या सर्व गोष्टींसाठी महाराष्ट्र अग्रेसर आहे. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महाराष्ट्र सरकारचे स्टार्ट अप कार्यक्रमांना प्रोत्साहित करून देशाचे स्टार्टअप हब अशी ओळख बनविल्याबद्दल अभिनंदन केलेले आहे.
आगामी निवडणुकांच्या निकालानंतर अजून एका टर्मच्या माध्यमातून माध्यमातून आत्ता सुरू केलेल्या या सर्व गोष्टी अजून जास्त सक्षम करून महाराष्ट्रातील युवकांना व्यवसाय, व्यवसाय संस्कृती, आणि संकल्पना या दृष्टीने अधिक कार्यक्षम करण्याची संधी मिळेल अशी आशा आहे.
Comments
Post a Comment