प्रयोगशील आणि अभिनव असे महाराष्ट्राचे महसूल मंत्री


2014च्या निवडणुकांनंतर महाराष्ट्र मध्ये बीजेपी सरकारची स्थापना झाली आणि बीजेपी सरकारचे महत्त्वाचे आधारस्तंभ माननीय महसूल मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महसूल खात्याबरोबरच अन्य खात्यांचा ही पदभार स्वीकारला. महाराष्ट्राचे महसूल मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत लक्षणीय राहिली आहे, कारण त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय आणि नाविन्यपूर्ण कल्पना उपयोगात आणल्या गेल्या.जर कोणी असे म्हटले की महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे राज्याचे सर्वात प्रयोगशील आणि यशस्वी महसूलमंत्री ठरले आहेत तर त्यात काहीच वावगे असणार नाही. श्री चंद्रकांत दादा पाटील यांची महसूलमंत्री ही कारकीर्द अनेक महत्त्वाचे निर्णय आणि त्यांची योग्य अंमलबजावणी यासाठी नेहमीच संस्मरणीय राहील.
आता राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत, या पार्श्वभूमीवर माननीय महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे निवडणूक मोहिमांमध्ये व्यस्त आहेत. तरीही त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामधून ते ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जनसंपर्क साधण्याचा प्रयत्न करतातकाही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याद्वारे महसूल विभागाच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि प्रयोग यांची माहिती मिळते.

या व्हिडीओ मध्ये श्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे की त्यांच्या कारकिर्दीमध्ये महसूल विभागाच्या अनेक सेवा ऑनलाइन उपलब्ध करण्यात आल्या आणि हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल. डिजिटल महाराष्ट्र या  मोहिमेच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या सेवांचे डिजिटायझेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. 48 सेव्हन पैकी 16 सेवा आता ऑनलाईन उपलब्ध असून त्यामुळे लोकांच्या सुविधांमध्ये निश्चितच वाढ झालेली आहे. महसूल विभागाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सातबारा उताराचे डिजिटायझेशन आणि त्याबरोबरच डिजिटल सिग्नेचरचा वापर. या यंत्रणेमुळे शेतकरी आणि ग्रामीण जनतेला सरकारी ऑफिसमध्ये सातबारा उतारा माराव्या  लागणाऱ्या फेऱ्या कमी झाल्या असून इतरही काम सोपे झालेले आहे. सातबारा उतारा आता ऑनलाइन फॉर्म भरून उपलब्ध होतो आणि हा अनुभव अत्यंत सुखद आहे.  
महाराष्ट्राचे महसूल मंत्री म्हणून श्री चंद्रकांत पाटील यांनी इतरही महत्त्वाचे निर्णय महसूल विभागामध्ये लागू केले ज्यामध्ये जागांच्या  सर्वे आणि मॅपिंग साठी ड्रोन कॅमेराचा वापर सुरू करण्यात आला. तसेच श्री चंद्रकांत दादा पाटील यांची टर्म अजून एका महत्त्वाच्या निर्णयासाठी नावाजली जाईल ते म्हणजे गावठाण यांच्या जागांसाठी जीआयएस पद्धतीचा अवलंब त्यांनी सुरू केला. त्याचप्रमाणे गावठाण  भागासाठी जीआयएस पद्धत वापरून प्रॉपर्टी कार्ड ही बनवण्यात आले. या सर्व निर्णयामुळे सीमा निश्चित करण्यास सरकारी  यंत्रणांना अतिशय फायदा झालेला आहे. त्याचप्रमाणे शहर-गावांमधील रस्ते, पाणवठे, लँडस्केप  इत्यादींचे वर्गीकरण आणि माहिती अचूक उपलब्ध झाल्यामुळे भूमी संपादन ही प्रक्रिया सोपी झालेली आहे ज्यामुळे शहर आणि गावांचे औद्योगिक आणि आर्थिक महत्त्व अधिक वाढताना दिसते. तसेच डिजिटल सिस्टीम्समुळे  मुळे जागांच्या मालकीहक्क वरील वाद आता कमी प्रमाणात दिसण्यात येतील.
महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने या पाच वर्षाच्या कारकिर्दीत डिजिटल सिस्टीमच्या माध्यमातून अनेक अभिनव कल्पना आणि तंत्रज्ञानाचा वापर महसूल विभागाच्या कार्यासाठी केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड,जीआयएस यंत्रणा अवलंब, ड्रोन कॅमेरा  यांचा समावेश करावा लागेल. श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अत्यंत नाविन्यपूर्ण, प्रयोगशील ,आणि वैभव शाली अशा महसूल मंत्री या कारकिर्दीचा आता समारोप होत आहे. या सर्व यंत्रणा सुधारण्याबरोबरच त्यांनी महसूल विभागाच्या ह्यूमन रिसोर्सेस म्हणजेच स्टाफच्या गरजा नेहमीच जाणून घेतल्या आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने त्यांनी  हा विभाग गेली पाच वर्षे अतिशय सक्षमतेने सांभाळला आहे असे म्हणावे लागेल.

Comments

Popular posts from this blog

सोसायट्यांचे पुनर्निर्माण-- कोथरूडच्या विकासाची किल्ली

Press Conference at Kolhapur- Chandrakant Patil

“Karkarta Karta-Dharta” Movement—A Huge Success