वाशी एपीएमसीला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा


कृषिमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतेच असे आश्वस्त केले की वाशी-मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला (APMC) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. वाशी .पी.एम.सी. ही आशियामधील सर्वात मोठी मार्केट प्लेस म्हणून ओळखली जाते. तेथील नवीन दुकानांच्या उद्घाटनासाठी श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थिती लावली होती. वाशी एपीएमसी मधील संभाजी महाराज भाजीपाला कॅम्पस येथील नवीन 285 दुकानाचे उद्घाटन श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी असा निर्धार व्यक्त केला की वाशी एपीएमसीला लवकरच जागतिक दर्जाच्या सुविधा सरकारतर्फे ते उपलब्ध करून देतील.

माननीय श्री चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज कॅम्पस, मार्केट कॉम्प्लेक्स, वाशी येथे 285 दुकानांच्या संकुलाच्या उद्घाटनाला नुकतीच उपस्थिती लावली. या कार्यक्रमादरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक मूलभूत आणि रचनात्मक बदल होणे आवश्यक आहे. श्री पाटील यांच्या मते सध्या मार्केट प्लेसमध्ये कृषी-आधारित अन्य व्यवसाय यासाठी  फारसा विचार केला जात नाही परंतु आधुनिक मार्केट प्लेस मध्ये यावर भर दिला जाईल आणि शेती संबंधित अन्य उद्योगांसाठी दुकाने आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचप्रमाणे त्यांनी असेही मत व्यक्त केले की आपल्याकडील कृषी उत्पन्न हे व्यवस्थित चांगल्या रीतीने प्रक्रिया पूर्ण करून आंतरराष्ट्रीय पातळीवर विकले जावे आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या चाचण्या, दर्जा, आणि नियम यांची पूर्तता आपल्याला करता आली पाहिजे. त्यांनी एपीएमसी प्रशासक श्री सतीश सोनी यांना सूचना दिल्या की त्यांनी भारतीय कृषी उत्पन्न आंतरराष्ट्रीय दर्जावर अधिकाधिक निर्यात करता यावे यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करावा. श्री पाटील पुढे म्हणाले की जरी ते सध्या सहकारमंत्री नसले तरी निश्चितच वाशी एपीएमसीला ते नक्कीच मजबूत करण्याचा प्रयत्न करतील ज्याद्वारे ती एक महत्वपूर्ण लक्षणीय मार्केटप्लेस ठरेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न करेल.
या उद्घाटन समारंभाला आमदार मंदा म्हात्रे, अण्णासाहेब आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील, वडार समाज अध्यक्ष श्री विजय चौगुले, एपीएमसी प्रशासक श्री सतीश सोनी, माजी सभापती शुभांगी पाटील, नवी मुंबई बीजेपी अध्यक्ष रामचंद्र घरात इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान माननीय महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की यावेळी आपल्याला पूरग्रस्त भागाला मदत करून या भागाचे वैभव आणि ओळख पुन्हा एकदा मिळवून देणे आवश्यक आहे. याकरिता आपदा अकाउंट सुरू केलेले आहेत तसेच सर्व बीजेपी आमदार, नगरसेवक यांनी एका महिन्याच्या पगाराचे योगदान पूरग्रस्त  निधीला दिलेले आहे. तसेच बीजेपीच्या अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागातील शाळांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत देण्याचे निश्चित केले आहे आणि याद्वारे शंभर पूरग्रस्त भागातील शाळांना मदत होईल.
माननीय कृषि मंत्री चंद्रकांत दादा पाटील  यांचा विकासाप्रतीचा दृष्टिकोन अत्यंत आदर्श आहे. त्यांना वाशी एपीएमसीला आंतरराष्ट्रीय मार्केट प्लेस म्हणून तयार करून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर पुरवण्याची योजना अत्यंत अभिनव आहे. या पद्धतीच्या दृष्टिकोनामुळे एक चांगल्या  पद्धतीची आयात-निर्यात संस्कृती आपल्या व्यापारात रुजू होईल आणि ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था संबळ होण्यास मदत होईल. पी एम सी एक आदर्श रोल मॉडेल म्हणून तेथील सुविधांमुळे निश्चितच नावारूपास येईल. माननीय महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची नाविन्यता आणि अनुभवसिद्धता यामुळे ते अनेकदा एक विश्वासार्ह, सकारात्मक ,आणि आदर्श नेतृत्व शैली महाराष्ट्राला प्रदान करतात. या प्रकल्पास आमच्या शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरांमधील वाशी एपीएमसीला लवकरच आंतरराष्ट्रीय मार्केट प्लेस मधून प्रसिद्धी प्राप्त होवो. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांना त्यांच्या भविष्यातील सर्व प्रकल्पांसाठी शुभेच्छा

Comments

Popular posts from this blog

“Karkarta Karta-Dharta” Movement—A Huge Success

सोसायट्यांचे पुनर्निर्माण-- कोथरूडच्या विकासाची किल्ली

Press Conference at Kolhapur- Chandrakant Patil