पोलीस स्टाफ सोबत रस्सीखेच
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील हे नेहमी विविध कार्यक्रम, बैठका, प्रकल्प यामध्ये व्यस्त असतात. अनेक विभागांना सांभाळत असताना ते स्वतःला नेहमी सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांमध्येही गुंतवतात. अशा कार्यक्रमांमधील त्यांची उपस्थिती एक गोष्ट निश्चितच दर्शवते ते म्हणजे ती म्हणजे या व्यक्तीचे सर्वसामान्यांमध्ये सामावून जाणे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा क्रीडा स्पर्धांचे आयोजन पोलीस विभागातर्फे करण्यात आले होते तेव्हा चंद्रकांत दादा पाटील यांनी पोलीस स्टाफ सोबत रस्सीखेच हा
धमाल सामना अनुभवला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या सामन्यात त्यांनी पोलीस स्टाफला हरवले.
हो... हे खर आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये कोल्हापूर शहरात पोलीस डिपार्टमेंटच्या क्रीडा सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यांना उपस्थिती लावली परंतु आश्चर्य हे होते की अंतिम सामना राजकारणी विरुद्ध पोलिस स्टाफ असा रंगला आणि तो रस्सीखेच किंवा प्रसिद्ध गेम टग ऑफ वार होता. या मॅच मध्ये श्री चंद्रकांत दादा पाटील यांना बीजेपी आमदार अमल महाडिक, म्हाडा प्रेसिडेंट समरजित सिंह घाडगे यांनी कंपनी दिली तर पोलिस टीमला श्री विश्वास नांगरे पाटिल यांनी साथ दिली.
या दोन टीम मध्ये अटीतटीची मॅच झाली आणि असा कयास होता कि श्री विश्वास नांगरे पाटील यांची टीम मॅच जिंकेल कारण पोलीस नेहमीच व्यायाम आणि क्रीडाविषयक गोष्टींमध्ये व्यस्त असल्यामुळे फिट असतात. परंतु आश्चर्य म्हणजे असे झाले नाही. राजकारण्यांची टीम जिला चंद्रकांतदादा पाटील यांनी लीड केली होती ती या मॅच मध्ये जिंकली आणि सर्व क्रीडा रसिकांसाठी एक आश्चर्याचा सुखद धक्का होता की त्यांचे लाडके नेते जिंकले. तसेच श्री पाटील यांनी फिजिकल फिटनेस, तंदुरुस्ती आणि खेळाचे महत्त्व देखील अधोरेखित केले.
श्री चंद्रकांत पाटील यांचा विविध सामाजिक कार्यक्रमातील सहभाग नेहमीच उत्साहदायक आणि प्रेरित करणारा असतो. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी, शेतकरी, तरुण या सर्वांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे खेळाबद्दल असणारे प्रेम आणि कोल्हापूरमध्ये क्रीडा संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी चालू असलेले प्रयत्न नेहमीच दिसून आलेले आहेत. कोल्हापूरची स्टार खेळाडू कुमारी तेजस्विनी सावंत उर्फ तेजू हिच्यासाठी ते नेहमीच एक उत्तम मार्गदर्शक राहिले आहेत. त्यांचे विद्यार्थ्यांच्या सहली तसेच पर्यटन संदर्भातील कार्यक्रम, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग त्यांना इतर राजकारणी व्यक्ती पेक्षा खूप वेगळ्या पातळीवर आणि उंचीवर नेऊन ठेवतो. त्यांच्या अशा स्वभावामुळेच ते अत्यंत लोकप्रिय राजकारणी म्हणून नावाजले जातात आणि ही गोष्ट त्यांच्यासाठी फार मोठी ताकद आहे.
Comments
Post a Comment