कोल्हापूर येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन
मराठा समुदायाला आरक्षण हा बीजेपी सरकारचा पहिल्या टर्ममधील षटकार असंच म्हणावं लागेल. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे या ऐतिहासिक निर्णयासाठी नेहमीच श्रेयस्कर राहतील. तत्पूर्वी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी 40 वर्षांपासून प्रलंबित होती आणि बीजेपी सरकारने ही मागणी पद्धतशीर दृष्टिकोन , नियोजन आणि तज्ञ विधिज्ञांचा उपयोग करून मार्गी लावली. अशाप्रकारे हायकोर्टाने 12 ते 13 टक्के आरक्षण मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये देऊ केले.
महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाज दहा टक्के आहे आणि आणि त्यांच्या आरक्षणाची मागणी 1968 पासून दुर्लक्षित होती. काँग्रेस सरकारने यासंदर्भात काही काम केले परंतु त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांना यामध्ये यश प्राप्त झाले नाही. मात्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या बीजेपी सरकारने या मागणीवर भर दिला आणि कायदे पंडितांची नेमणूक या कामासाठी केली, या सर्व एकत्रित प्रयत्नांमुळे मराठा समाजाला आरक्षण प्राप्त झालेले आहे.
माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांना नेहमीच मराठा समाजामध्ये प्रेरणास्थान आणि आधारस्तंभ मानले जाते. मराठा समाजाच्या आरक्षण प्रक्रियेमध्ये त्यांचा वाटा मोलाचा आहे. नागरिकांनी आणि सकल मराठा समाज कोल्हापूर यांनी मराठा आरक्षण पूर्ततेच्या यशासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कृतज्ञता मेळावा असे या कार्यक्रमाचे नाव असून केशवराव भोसले ऑडिटोरियम, कोल्हापूर येथे हा कार्यक्रम संपन्न होईल. या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार संभाजी राजे, माजी मुख्यमंत्री श्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि इतर मान्यवरांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.
दरम्यान सकल मराठा समाज संस्थेच्या वतीने जास्तीत जास्त लोकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला इतर अनेक मान्यवर, आमदार, राजकीय नेते, खासदार यांची उपस्थिती लक्षणीय ठरेल.
कार्यक्रमाचे आयोजक श्री जयेश कदम यांनी माहिती दिली की मराठा समाजाच्या आरक्षणाची रास्त मागणी या सरकारने पूर्ण केली आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे. या मोहिमेमध्ये अनेक तज्ञ लोक आणि इतर घटकांचा समावेश आहे. या सर्व व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि हे यश व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता मेळावा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाला समाजाच्या अनेक मान्यवरांची उपस्थिती असेल. यामध्ये प्रामुख्याने मराठा महासंघ प्रमुख शशिकांत पवार, मराठा सेवा संघ अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, विधिज्ञ श्री सतीश माने, तसेच अभिजीत पाटील हेही उपस्थित राहतील.
श्री चंद्रकांत दादा पाटील हे मराठा समाजाच्या नेतृत्वाची योग्य कमान आहेत आणि आणि मराठा समाजाचा आरक्षणामध्ये त्यांची भूमिका लक्षणीय ठरली. यामुळे त्यांचा सत्कार सकल मराठा समाजातर्फे कोल्हापूर येथे होत आहे. मराठा समाजाचे आरक्षण हा एक मोठा निर्णय असून याचा फायदा पुढच्या अनेक पिढ्यांना निश्चितच होईल. याच बरोबर आम्ही आमच्या शुभेच्छा मराठा समाजाच्या भावी वाटचालीसाठी देतो.
Comments
Post a Comment