दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींना शैक्षणिक सवलती मिळणार - चंद्रकांत दादा पाटील
महाराष्ट्र
राज्याचे महसूल आणि कृषी
मंत्री माननीय श्री. चंद्रकांत
दादा पाटील यांनी
10 जून 2019 रोजी त्यांचा
साठावा वाढदिवस साजरा केला.
या दिवशी एका
मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारने
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष
सवलती जाहीर करून
त्यांना दिलासा दिलेला आहे,
तसेच महाराष्ट्र सरकारने
दुष्काळाशी लढा देण्यासाठी
विविध निर्णय घेऊन
दुष्काळाच्या धडा कमी
करण्याचा प्रयत्न केला असे
सांगितले.
माननीय श्री.
चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती दिली
की सुदैवाने बीजेपी
सरकारने दुष्काळाशी अत्यंत यशस्वीपणे
लढा दिलेला आहे.
सरकारने मुबलक चारा, टॅंकरद्वारे
पाण्याची सोय आणि
रोजगार लोकांना उपलब्ध करून
दिलेला आहे. राज्यातील
चारा छावण्या जास्तीत
जास्त काळजी घेऊन
चालवण्यात आल्या आणि त्याचा
फायदा राज्यातील पशुधनाला
झाला. सुदैवाने मान्सून
वेळेवर आल्यामुळे आता परिस्थिती
आटोक्यात आलेली आहे, तरीही
दुष्काळ निवारणाच्या विविध निर्णयांची
अंमलबजावणी जून अखेरपर्यंत
राज्यात होणार आहे.
Comments
Post a Comment