पुण्यामधील गणेशोत्सवामध्ये सहभाग
गणेश उत्सव हा वर्षातला एक महत्त्वाचा आणि मोठा उत्सव असतो आणि जेव्हा पुण्याच्या अनुषंगाने गणेश उत्सवाकडे पाहिले जाते तेव्हा त्याचे पावित्र्य आणि महत्त्व अजूनच वाढते. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव साजरा केला जातो. हे एक आनंद पर्व असते आणि या उत्सवामध्ये सर्वजण सहभागी होतात कारण हा सगळ्यांच्या लाडक्या आराध्यदैवत गणेश किंवा बाप्पाचा उत्सव असतो.
महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव घरगुती तसेच सामाजिक पातळीवर साजरा केला जातो. महान स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांनी सामुदायिक गणेशोत्सवाची सुरूवात केली ज्यामधून त्यांचा मुख्य उद्देश समाजामध्ये एकता निर्माण करणे हा होता. पारंपारिक महाराष्ट्रीय व्यक्तींनी ही प्रथा सुरू ठेवली आणि म्हणूनच आज गणेशोत्सव घरगुती तसेच सामाजिक संस्था, सोसायटी, क्लब येथे साजरा केला जातो. गणेशोत्सवामध्ये लोकं त्यांच्या लाडक्या बाप्पाची पूजा करतात आणि एकूणच हे पर्व अतिशय श्रद्धामय झालेले असते. जेव्हा राज्यातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणामध्ये दंग झालेली आहे तर गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये आहे पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे थोडेफार योगदान कसे काय नसेल?
असो, बीजेपी महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत
दादा पाटील यांची नुकतीच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील नियुक्ती झालेली आहे. श्री. चंद्रकांत दादा पाटील त्यांच्या समाजकार्य सोबतच नेहमीच विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. तर यावर्षी माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांना पुणे स्टाईल गणेशोत्सवामध्ये सहभागी होता आले आणि ते या सुंदर क्षणांचे साक्षीदार बनू शकले.
श्री. पाटील यांनी त्यांच्या या पवित्र उत्सवातील सहभागासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. यातील एक प्रमुख ट्विट केसरीवाडा गणपतीच्या संदर्भात होते. माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी केसरीवाडा गणपती येथे स्वयंचलित कृत्रिम रोबोटचे उद्घाटन केले, विस्मयकारक आहे, परंतु खरे आहे. या रोबोटचे काम भाविकांना प्रसाद वाटणे हे असणार आहे. तंत्रज्ञानातील बदल आजकाल प्रत्येक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बदलत आहेत त्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे हे एक जबरदस्त उदाहरण म्हणता येईल. टाटा ऑटोमेशन लॅब यांनी तयार केलेला हा स्वयंचलित रोबोट भाविकांना प्रसाद वाटतो आणि हा रोबोट केसरीवाडा गणपती पुणे येथे आपल्याला पाहायला मिळेल. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते या रोबोटचे उद्घाटन झाले. श्री. पाटील देखील या प्रकल्पामुळे विस्मित झाले होते आणि त्यांनी लगेच या रोबोटचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर वर पोस्ट केला.
त्यांच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकामध्ये त्यांनी साई मित्र मंडळ गणपतीला देखील भेट दिली. या मंडळाने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची प्रतिकृती तयार केलेली आहे आणि या परिसरातील भाविकांसाठी हे मोठे आकर्षण आहे. यावेळी श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी विठोबा कडे महाराष्ट्राला समृद्धी आणि आनंद मागितला. यादरम्यान त्यांच्यासोबत खासदार माननीय श्री. गिरीश बापट आणि नगरसेवक व मंडळ अध्यक्ष श्री. मुरलीधर मोहोळ हेदेखील उपस्थित होते.
माननीय श्री.
चंद्रकांत दादा पाटील नेहमीच त्यांची सामाजिक जबाबदारी विविध माध्यमांमधून व्यक्त करतात. यावर्षी त्यांना पुणे स्टाईल गणेशोत्सवामध्ये सहभाग घेता आला आणि त्यांनी केसरीवाडा गणपती आणि टाटा ऑटोमेशन यांच्या रोबोट या प्रकल्पाविषयी माहिती दिली आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही की हा रोबोट यंदाच्या पुण्याच्या गणेशोत्सवातील सर्वात जास्त चर्चिला गेलेला विषय आहे. श्री. पाटील नेहमीच म्हणतात की श्रद्धा ,देव ही संकल्पना व्यक्तिपरत्वे बदलतात परंतु या सर्वातून चांगली तत्वे आणि संकल्पना यांना आत्मसात करणे गरजेचे असते. अशा उत्सवामधून तयार होणारी सकारात्मक ऊर्जा खूप महत्त्वाची असते आणि आणि ही ऊर्जा भविष्यातील चांगल्या कामांसाठी नक्कीच साथ देते. खरंच माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे विचार प्रक्रिया प्रशंसनीय आहे. गणपती बाप्पा मोरया!!
Comments
Post a Comment