220 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार


महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका 21 ऑक्टोबरला जाहीर झाल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष निवडणूक मोहिमांमध्ये सध्या व्यस्त आहेत. याचदरम्यान बीजेपीने महाजनादेश यात्रेचे आयोजन केले होते आणि ही मोहीम सर्वार्थाने यशस्वी ठरली. महाजनादेश यात्रेच्या  निमित्ताने बीजेपीच्या नेत्यांना बीजेपी कार्यकर्ते आणि मतदारांशी सुसंवाद साधण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे या मोहिमेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणणे आणि विविध सूचना देखील मागवल्या गेल्या. महाराष्ट्र बीजेपी अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की महाजनादेश यात्रा ही एक उत्कृष्ट निवडणूक मोहीम असून या मोहिमेला मिळालेले प्रचंड यश आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता यामुळे येत्या निवडणुकांमध्ये 220 हून अधिक जागा बीजेपी निश्चितच जिंकणार आहे.

श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बीजेपीचा 220 पेक्षा जास्त  जागा जिंकण्याचा निर्धार स्पष्ट केला. या पत्रकार परिषदेदरम्यान श्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की विधानसभा निवडणुकांमध्ये बीजेपी निश्चितच 220 हून अधिक जागा जिंकणार आहे. महाजनादेश यात्रेला मिळालेला लोकांचा भव्य पाठिंबा तसेच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांची लोकप्रियता या दोन्ही गोष्टी बीजेपीच्या  निवडणुकीतील भव्य यशाविषयी ग्वाही देतात.
महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले की सध्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकांच्या जागांविषयी चर्चा सुरू आहे आणि या संदर्भातील निश्चित माहिती लवकरच सर्वांसमोर येईल.  
माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या  मते बीजेपीच्या निवडणूक मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट लोकांना बीजेपीच्या कार्याविषयी माहिती देणे हे होते. सुदैवाने या मोहिमेला लोकांनी उत्तम प्रकारे पाठिंबा दिला. या मोहिमेने 3999 किलोमीटर अंतर  सर केले, तसेच महाराष्ट्रातील 142 मतदारसंघांमधून मतदारांशी या मोहिमेच्या माध्यमातून संवाद साधता आला. या मोहिमेला मतदारांचा मिळालेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे आता निश्चितच कोणीही या निष्कर्षाला येऊ शकेल की बीजेपीला 220 हून अधिक जागांवर निवडणुकांमध्ये यश संपादन होणार आहे.
श्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की महाजनादेश  यात्रेचे मुख्य उद्दिष्ट लोकांना बीजेपीच्या मागच्या पाच वर्षातील कार्यपद्धती आणि कार्य यांविषयी जागृत करणे हे होते. त्याचप्रमाणे या मोहिमेअंतर्गत लोकांकडून सूचनाही मागवल्या गेल्या. या मोहिमेमधून 160 प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच औरंगाबाद ,पुणे, आणि इचलकरंजी येथील रोड शो ला लोकांचा भव्य प्रतिसाद मिळाला. एक विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या मोहिमेला मुस्लिम समाजातील महिलांनीही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. इतकेच नाही तर या मोहिमेअंतर्गत 3.50 करोड रुपये  इतक्या आर्थिक मदतीची उभारणी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विदर्भ आणि मराठवाडा विभागातून करण्यात आली.
आपल्या पत्रकार परिषदेतील भाषणाचा समारोप करताना श्री पाटील यांनी नमूद केले की लवकरच बीजेपीच्या शक्ती मेळाव्यांचे आयोजन राज्यात होणार आहे. अशा एकूण वीस हजार मेळाव्यांचे आयोजन राज्यांमध्ये 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान केले जाईल.
महाराष्ट्रामध्ये निवडणूकाचा हंगाम सुरू असताना बीजेपी नेते आणि कार्यकर्ते यांच्या आत्मविश्वासामध्ये मागील पाच वर्षाच्या सकारात्मक कार्यामुळे, तसेच लोकसभा निवडणुकातील यशामुळे, आणि नेत्यांच्या विश्वासार्ह नेतृत्व शैलीमुळे  प्रचंड वाढ झालेली आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान चंद्रकांतदादा पाटील यांनी बीजेपी साठी पुढील पाच वर्षांची टर्म निश्चितपणे साकार करण्याचे इरादे स्पष्ट केले. काळाबरोबर गोष्टी स्पष्ट होतील तोपर्यंत फिंगर्स क्रॉस.

Comments

Popular posts from this blog

Press Conference at Kolhapur- Chandrakant Patil

सोसायट्यांचे पुनर्निर्माण-- कोथरूडच्या विकासाची किल्ली

Positive Communication with Oil Companies for Gas/Stoves and Cylinder Availability