मोदी सरकार 2.0 चे शतक
या आठवड्यात मोदी सरकार शंभर दिवसांची टर्म पूर्ण करीत आहे त्याच दरम्यान माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी मुंबई येथे येत आहेत. आपल्या विविध बैठकीमध्ये आणि भाषणांमध्ये माननीय पंतप्रधानांनी या शंभर दिवसांच्या कारकिर्दी मधील महत्त्वाच्या निर्णयांचा परामर्श घेतला आहे. महसूल मंत्री आणि महाराष्ट्राचे बीजेपी अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर या मोदी 2.0 टर्मच्या तर विविध महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल भाष्य केले आहे.
श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माननीय पंतप्रधान यांच्या मुंबई दौरा आणि येथील विविध प्रकल्पाचे उद्घाटन याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. यातील महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे पंतप्रधान मेट्रो मार्गिका दहा, अकरा, बारा आणि मेट्रो हब यांच्या भूमिपूजन समारंभाला येत आहेत. तसेच पहिल्या मेट्रो कोचंचे उद्घाटन आणि बाणेडोंगरी मेट्रो रेल्वे स्टेशनचे उद्घाटन. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल श्री भगतसिंग कोशारी आणि मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांची ही उपस्थिती असेल.
महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मेट्रोच्या विविध उपयुक्ततेविषयी स्पष्ट केले आहे. त्यांच्या विश्लेषण नुसार मेट्रोच्या प्रवासामुळे सुविधा आणि सोयीस्करपणा वाढणार आहे. नवीन उद्घाटन झालेल्या मेट्रोमुळे रोज 41 लाख प्रवाशांना फायदा होईल. तसेच मुंबई हे पहिले देशातील पहिले एकात्मिक वाहतूक शहर असेल जिथे एकाच तिकिटावर संपूर्ण शहरभर प्रवास करता येईल. 2024 पर्यंत एक करोड प्रवासी मेट्रो मधून प्रवास करणे अपेक्षित आहे. मेट्रो हब अत्यंत आधुनिक यंत्रणा असून तिथून स्वयंचलित मेट्रो कंट्रोल होतील. मेट्रोमुळे पन्नास हजार लोकांना प्रत्यक्ष नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे मेट्रो कोच मेक इन इंडिया कॅम्पेन अंतर्गत बनवण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातील नाशिक येथे हायब्रीड मेट्रो प्रोजेक्ट सुरू करण्यात येतोय आणि त्याचा फायदा नाशिकमधील रहिवाश्यांना नक्कीच होईल.
माननीय पंतप्रधानांचे शंभर दिवसांच्या यशस्वी पर्वासाठी अभिनंदन करताना श्री चंद्रकांत
दादा पाटील यांनी उज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, मेक इन इंडिया योजना यांचाही विशेष उल्लेख केला आहे. या सर्व योजना भारतीय नागरिकांचे आयुष्य सकारात्मक दृष्टीने बदलत आहेत, तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेमधून 7318 विद्यार्थ्यांना 28 करोड रुपये आर्थिक मदत उच्चशिक्षणासाठी झालेली आहे. मोदी सरकारचे अनेक निर्णय समाजाच्या विविध घटकांसाठी लक्षणीय ठरले आहेत ज्यामध्ये विशेषतः कामगार, महिला, आणि अल्पसंख्यांक यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. मोदी सरकारच्या विविध यशस्वी आलेखाचा आढावा घेताना माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी इस्रोच्या चांद्रयान-2 प्रकल्पाचा ही आवर्जून उल्लेख केला.
निश्चितच मोदी सरकार भारताला एका वेगळ्या प्रगतीच्या दिशेने मार्गस्थ करीत आहे आणि त्याच वेळी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये विरोधीपक्ष विविध पद्धतीने अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात, परंतु जनतेला विश्वास आहे की त्यांचा देश हा सुरक्षित हातामध्ये आहे. सारांश, बीजेपी अध्यक्ष, महाराष्ट्र चंद्रकांत दादा पाटील यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवीन टर्मच्या शतकी खेळी बद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. भारताबाबतची त्यांची सर्व स्वप्ने लवकर पुर्ण होउदे अशी सदिच्छा व्यक्त करून आम्ही आता समारोप करतो.
Comments
Post a Comment