मराठा समुदायाच्या आरक्षणाच्या निर्णयावर प्रतिक्रिया
मराठा समुदायाचे आरक्षण ही महाराष्ट्राच्या इतिहासामधील एक अत्यंत प्रलंबित मागणी होती. या मागणीसंदर्भात कृती करण्याचा प्रयत्न अगोदरच्या सर्व सरकारने केला.
परंतु यामध्ये कोणत्याच सरकारला यश आले नव्हते, या परिस्थितीत जेव्हा बीजेपी सरकार राज्य अस्तित्वात आले तेव्हा विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि बीजेपी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले असून माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला आरक्षण प्राप्त करून दिले आहे आणि या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील हेदेखील या अभूतपूर्व निर्णयासाठी श्रेयस्कर मानले जातात. ते मराठा आरक्षण निर्णयासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत.
27
जून 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय वैध ठरवला असून 12 ते 13 टक्के आरक्षण मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये दिले जाऊ शकते असे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी अशी प्रतिक्रिया दिली की बीजेपी सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात नेहमीच सकारात्मकता दाखवली होती आणि याचे मुख्य कारण मराठा समाज आर्थिक आणि शैक्षणिक बाबींमध्ये मागास असणे हे होते. 2014 च्या निवडणुकांपूर्वी बीजेपी सरकारने मराठा समाजाला आश्वस्त केले होते की या समाजाला न्यायालयीन प्रक्रियेत आरक्षण मिळेल हे बीजेपी सरकारचे ध्येय असेल.
श्री. पाटील पुढे म्हणाले की बीजेपी सरकारला त्यांच्या वचनाची पूर्तता करण्यात यश आलेले आहे. या कार्यासाठी एका स्वतंत्र समितीची स्थापना मागणीचे विश्लेषण आणि अभ्यास करण्यासाठी करण्यात आली होती. तसेच या समितीचे अध्यक्ष स्वतः श्री. चंद्रकांत दादा पाटील हे होते. या समितीच्या सदस्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीचा विचार विविध पातळ्यांवर केला आणि या समितीला मराठा समाजाला आरक्षण देणे जरुरी असल्याचे पटवण्यात यश आलेले आहे. या सर्व कार्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची ही महत्त्वाची मदत झालेली आहे, त्यांनी दिलेल्या अहवालामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत यशस्वी ठरलेला आहे.
माननीय श्री. चंद्रकांत
दादा पाटील यांच्या मते मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय हा ओबीसी आरक्षणाच्या पद्धतीला धक्का न लावता घेतलेला आहे आणि ही मराठा आरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक बाजू आहे. सरकारने आश्वस्त केल्याप्रमाणे मराठा समुदायाला आरक्षण प्राप्त झालेले आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केलेले आहे. अशाप्रकारे बीजेपी सरकारला त्यांचे वचन पूर्तता करण्यात यश प्राप्त झालेले आहे. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी मराठा आरक्षण समितीचे सदस्य, मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांचेही त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले, तसेच श्री.पाटील यांनी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानून या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन केले आहे.
मराठा समुदायाच्या आरक्षणाचा निर्णय जून महिन्यामध्ये लागलेला आहे. या निर्णयाचे महत्त्व आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अनन्यसाधारण असणार आहे. आता असे गृहीत धरले जाऊ शकते की बीजेपी सरकारला मराठा वोट बँकचे लक्ष आकर्षित करण्यात यश प्राप्त झालेले आहे आणि याचा परिणाम म्हणून असे म्हटल्यास काही गैर ठरणार नाही की बीजेपीला आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विक्रमी यशाची नोंद करता येईल. महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समुदाय दहा टक्के आहे आणि या निर्णयामुळे बीजेपीला मराठा समुदायाच्या पाठिंब्याचा कायमस्वरूपी फायदा होईल. माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि माननीय महसूल मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समुदायाला बीजेपीच्या प्रवाहात आणण्यासाठी नेहमीच स्तुत्य राहतील,तसेच आगामी विधानसभा निवडणुकांच्या यशाचे शिल्पकार ठरतील. दोन्हीही माननीय मंत्री भविष्यात अधिक जबाबदारी, सन्मान ,आणि भूमिका यांचे दावेदार ठरतात आणि महाराष्ट्राचे नेतृत्वाचे योग्य चेहरे म्हणून केंद्रामध्ये लक्ष वेधू शकतात.
Comments
Post a Comment