अभेद्य अशी शिवसेना- बीजेपी युती
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमाला नुकतीच उपस्थिती लावली. या कार्यक्रमादरम्यान श्री. चंद्रकांत दादा पाटील असे म्हणाले की शिवसेना- बीजेपी यांची युती अभेद्य आहे आणि ती दोन्ही पक्षांची ताकदही आहे. इतर कोणत्याही राजकीय पक्षाला या युतीला आवाहन देणे आणि पराभूत करणे अशक्य आहे. शिवसेना-बीजेपी युतीने राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व बालेकिल्ले उद्ध्वस्त केलेले आहेत.
महसूल मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्ह्यामधील कवठेपिराण गावामध्ये एका कार्यक्रमाला नुकतीच उपस्थिती लावली. हा कार्यक्रम हिंदकेसरी श्री. मारुती माने यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाला इतर अतिथीमध्ये कृषी राज्यमंत्री श्री.सदाभाऊ खोत, आमदार श्री. धैर्यशील माने, आमदार श्री. सुधीर दादा गाडगीळ, आणि आदर्श सरपंच श्री. भीमराव माने यांचा समावेश होता.
या कार्यक्रमादरम्यान श्री. चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की बीजेपीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि श्री. शरद पवार यांना लोकसभा निवडणुका दरम्यान जेरीस आणले आहे. भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व बालेकिल्ले उध्वस्त करण्यात यशस्वी झालेली आहे. त्यांना फक्त नशिबाने बारामती मतदारसंघ वाचवता आला आहे.श्री. चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले की शिवसेना आणि बीजेपी यांच्यामधील युती अभेद्य आणि अपराजित आहे. कोणतीही राजकीय पक्ष शिवसेना आणि बीजेपी युतीला आवाहन देऊ शकत नाही.
श्री.चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान शिवसेना-बीजेपी युतीचे स्वरूप स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की हे दोन्ही राजकीय पक्ष एकमेकांबरोबर सहृदय नाते बाळगतात. जर उद्या कोणी शिवसेना नेत्याने बीजेपी कडे मोर्चा वळवला तर शिवसेनेमध्ये असणाऱ्या नेत्यांना त्याबद्दल वाईट वाटण्याचे कारण नाही कारण शिवसेना आणि बीजेपी हे एका नाण्याच्या दोन बाजू प्रमाणे आहेत.
महाराष्ट्र राज्याचे कृषी आणि महसूल मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील हे शिवसेना-बीजेपी युतीच्या 17 व्या लोकसभा निवडणुकांमध्ये भव्य यशाचे शिल्पकार मानले जातात. त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यातील जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आणि चार मतदारसंघांमध्ये युतीला यश मिळवून दिले. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी निवडणूक मोहिमेदरम्यान बारामती मध्ये मुक्काम ठोकला होता आणि यामुळे पवार कॅम्पला भय निर्माण झाले होते. श्री. पवार या निवडणुकादरम्यान फक्त बारामती मतदारसंघ त्यांची कन्या सौ. सुप्रिया सुळे यांच्यासाठी वाचवू शकले. या पार्श्वभूमीवर श्री. पाटील यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबियांवर निशाणा साधला आहे आणि ही आगामी काळातील विधानसभा निवडणुकांची नांदी असू शकते. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे श्री. चंद्रकांत दादा पाटील आणि बीजेपीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या धोरणांची पुनर्रचना करणे आवश्यक असेल, कारण आगामी काळ त्यांच्यासाठी निश्चितच कठीण आहे.
Comments
Post a Comment