नवरात्रि विशेष 29 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2019


भारताची भूमी ही विविधता, संस्कृती, आणि एकता यांच्यासाठी ओळखली जाते. भारतीय जनता त्यांच्या संस्कृती आणि परंपरेला नेहमीच मान  देते आणि आणि या गोष्टींचा प्रसार विविध पिढ्यांमध्ये केला जातो. विविध उत्सव हे भारताच्या जीवनशैलीचा आवश्यक आणि अविभाज्य भाग राहिले आहेत.
नवरात्री हा एक महत्त्वाचा भारतीय उत्सव असून या उत्सवादरम्यान दुर्गादेवीची पूजा तसेच देवीच्या इतर रूपांची पूजा  हिंदू लोक श्रद्धेने करतात. या नऊ दिवसांच्या उत्सवादरम्यान देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. यावर्षी भारतामध्ये नवरात्री 29 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान विशेष उत्साहात साजरी होत आहे. नवरात्री उत्सवादरम्यान लोकांमध्ये श्रद्धा आणि उत्साह भरलेला दिसून येतो. हा उत्सव संपूर्ण देशात तसेच पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, आणि उत्तर भारतात विशेष करून साजरा केला जातो.
इतिहास 
नवरात्री उत्सवाला महाराष्ट्रमध्ये शारदीय नवरात्रोत्सव किंवा देवीचा उत्सव-जागर असेही संबोधले जाते. या उत्सवादरम्यान दुर्गादेवी तसेच देवीची इतर रूपे म्हणजेच महालक्ष्मी, पार्वती, महाकाली, सरस्वती यांची पूजा अति श्रद्धेने केली जाते. या देवींनी राक्षसी शक्तींचा नायनाट करून सर्वांना शांततापूर्ण जीवन प्राप्त करून दिलेले आहे. देवी सरस्वती किंवा शारदा देवी हिची पूजा सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये केली जाते. विविध देवीच्या रूपांनी महिषासुर, चंड, मुंड, मधु अशा अनेक राक्षसी शक्तींचा नायनाट करून जगातील सर्व लोकांना शांततापूर्ण आणि सुरक्षित जीवन प्राप्त करून दिलेले आहे.
महाराष्ट्रातील नवरात्र उत्सव 
या नऊ दिवसांमध्ये लोकं पूजा आणि उपवास ठेवतात. तसेच या उत्सवादरम्यान शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देवी सरस्वतीची पूजा केली जाते जी विद्येची आराध्य देवता आहे. तसेच नवरात्र उत्सवामध्ये कन्या पूजन, सुहासिनी पूजन, सप्तशती पाठ, जागरण अशा विविध धार्मिक विधींना प्राधान्य दिले जाते. त्याच प्रमाणे अनेक दानशूर व्यक्ती दानधर्म करण्यास प्राधान्य देतात. या दिवसांदरम्यान देवीच्या मंदिरामध्ये खूप उत्साहात लोक येतात तसेच देवळांमध्ये यात्रेचे ही आयोजन केलेले पाहण्यास मिळते. या पवित्र दिवसांमध्ये मुलींना गोड पदार्थ, शैक्षणिक साहित्य, कपडे, तसेच पैसे इत्यादींचे वाटप केले जाते. कुमारिकेला अप्रकट शक्ती मानल्यामुळे कुमारिका पूजन विधीस प्राधान्य दिले जातेमहाराष्ट्रामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट स्थापन करण्याची पवित्र प्रथा आहे. या प्रथेनुसार कलशाची स्थापना केली जाते आणि त्या भोवती धान्य पेरले जाते. तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आरती, पूजा, आणि इतर धार्मिक प्रथा आवर्जून पाळल्या जातात. या उत्साहपूर्ण सणाला दांडिया आणि गरबा यांच्या रूपाने सांस्कृतिक पैलूही लाभलेला आहे.
महाराष्ट्राचे बीजेपी अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वतीने आम्ही आज सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच प्रार्थना करतो की दुर्गादेवी आपणा सर्वांना समृद्धी, शक्ती, आरोग्य, आनंद, आणि समाधान या पवित्र उत्सवादरम्यान प्रदान करू दे.
महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील हे कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूर शहराला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ, तीर्थस्थळ ,आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असे महत्त्व आहे. या शहरातील पौराणिक महालक्ष्मी मंदिर हे एक महत्त्वाचे वारसास्थळ असून अनेक भक्त नवरात्र उत्सवामध्ये या धार्मिक पिठाला भेट देतात. कोल्हापूरमध्ये नवरात्र उत्सवास खूप महत्त्व आहे आणि येथील लोकं हा सण  धार्मिक पद्धतीने साजरा करतात.
माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना नेहमीच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कोल्हापूर येथे सहभागी होण्याची संधी लाभलेली आहे. अशाच एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले होते की अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमधून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. देवावरील विश्वास किंवा श्रद्धा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु अशा कार्यक्रमांमधून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा आणि स्पंदने ही नेहमीच भविष्यातील चांगल्या कामांसाठी उपयुक्त ठरतात.
आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून आपणा सर्वांना या पवित्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो.
अधिक माहिती साठी वाचा https://chandrakantdadapatil.blogspot.com


Comments

Popular posts from this blog

High Priority to The Completion of Pending Highway Works

Press Conference at Kolhapur

Statement on Pune’s 8 Vidhan Sabha Constituencies